How to Apply the 90/90 Rule for Diwali Cleaning : एखाद्या सणापूर्वी घर स्वच्छ आणि नीटनेटके दिसावे अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते. आता दिवाळी हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीची साफसफाई कशी आणि कधी करावी याबद्दल आपल्या सगळ्यांनाच भरपूर चिंता असते. तर आज सोशल मीडियावर अशी एक पोस्ट व्हायरल होते आहे; जी कदाचित तुम्हाला दिवाळीची साफसफाई करायला मदत करणार आहे.
दर दिवाळीत आपण आपल्या घरांचा प्रत्येक कोपरा घासण्यात, पुसण्यात आणि पॉलिश करण्यात तासनतास घालवतो. पण, खरा गोंधळ फक्त धूळ, अस्वच्छता नाही. तर साफ सफाई नंतर अशा गोष्टींचा ढीग आहे ;ज्या आपण कधीही वापरत नाही. तर या वर्षी, तुम्ही साफसफाई करण्यापूर्वी कपडे उचलण्यापूर्वी, तुमच्या जागेत आणि मनाला खरोखरच अडथळा निर्माण करणाऱ्या गोष्टी साफ करण्याचा प्रयत्न करा.
दिवाळीची साफसफाई सोपी, जलद करण्याचे रहस्य ९०/९० या नियमात लपलेलं आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ९०/९० नियम म्हणजे काय? तर गेल्या ९० दिवसांत जर तुम्ही एखादी वस्तू वापरली नसेल पुढील ९० दिवसांत ती वापरण्याची शक्यता फारच कमी असते; त्यामुळे तर ती वस्तू घरात ठेवण्याची गरज नाही. यामुळे अनावश्यक वस्तू घरातून कमी झाल्या की, घर नीटनेटके दिसते आणि साफसफाई करणे आणखीन सोपे होते. हा नियम मनातील गोंधळ कमी कारणा एक फिल्टर आहे; ज्यामुळे तुम्हाला त्वरित निर्णय घेण्यास मदत होते, अपराधीपणाची भावना राहत नाही आणि जास्त विचार करण्याची गरज सुद्धा भासत नाही.
तर आता हा नियम तुमच्या दिवाळीच्या साफसफाईत कसा वापरायचा?
१. हॉल – जिथे दिवाळीत तुमचे पाहुणे बसणार तिथून साफसफाईची सुरुवात करा. जुनी मासिके, तुटलेल्या सजावटीच्या वस्तू, न वापरलेले केबल वायर्स किंवा फर्निचर ; आदी अनेक गोष्टी उपयोगी नाहीत त्या टाकून द्या.
२. स्वयंपाकघर – तुमच्या स्वयंपाकघरात प्रत्यक्षात किती जागा आहे आणि तुम्ही किती जुनी भांडी, डुप्लिकेट कंटेनर ठेवले आहेत याकडे लक्ष द्या.
३. बेडरूम – अनेक महिने न घातलेले कपडे, जुनी बेडशीट, न वाचलेली पुस्तके घरातून काढून टाका.
४. बाथरूम – रिकाम्या बाटल्या, अर्धवट वापरलेली उत्पादने आणि कालबाह्य औषधे कचराकुंडीत फेकून द्या.
दिवाळीपूर्वी घरातील वस्तू फेकून देणे का फायदेशीर ठरत ?
कमी गोंधळ = जलद साफसफाईचा वेळ
अधिक जागा = दिवे, रांगोळ्या आणि दिव्यांसह सोपी सजावट
स्वच्छ घर = शांत, उत्साही मूड
दिवाळी ही फक्त चांदीच्या भांड्यांना चमकवण्याबद्दल नाही तर ती उर्जेच्या प्रवाहाबद्दल आहे. “जेव्हा तुम्ही घर स्वच्छ करता तेव्हा तुम्ही खरोखर महत्त्वाच्या म्हणजे आनंद, समृद्धी आणि शांतीसाठी घरात जागा बनवता” त्यामुळे या दिवाळीत “फक्त घर साफ करू नका; तर नव्याने सजवा आणि त्यात बदल करा!”