Lemon liquid cleaning solution: घरातील फरशीवर अनेकदा जेवणाचे डाग पडतात आणि ते निघायचं नाव घेत नाहीत. अनेक उपाय करूनही हे डाग तसेच दिसतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी लिक्विड क्लिनर तयार करून तुमची फरशी स्वच्छ करू शकता. विशेष म्हणजे हे लिक्विड क्लिनर फरशीवरील घाण साफ करण्यास, घरात सुगंध वाढवण्यास आणि नंतर फरशी चमकण्यास मदत करते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
लिंबापासून असे बनवा लिक्विड क्लिनर
साहित्य :
- लिंबू
- गरम पाणी
- बेकिंग सोडा
लिक्विड क्लिनर कसे बनवायचे
- लिक्विड क्लिनर बनवण्यासाठी लिंबू कापून गरम पाण्यात मिसळा आणि नंतर ते उकळवा.
- त्यानंतर हे पाणी गाळून घ्या.
- आता त्यात बेकिंग सोडा घाला.
- आता या पाण्याने फरशी पुसून टाका.
लिक्विड क्लिनरचे फायदे
- लिंबाच्या लिक्विड क्लिनरमध्ये सायट्रिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे फरशी स्वच्छ करण्यास मदत करते. याने पुसल्याने फरशी लवकर स्वच्छ होते. हे पाणी घाण आणि डाग साफ करण्यास उपयुक्त आहे. हे फरशीला चमक देण्यास मदत करते.
- लिंबाचे लिक्विड क्लिनर फरशी स्वच्छ करण्यासाठी आणि संपूर्ण घराला सुगंध देण्यासाठी उपयुक्त आहे. या लिंबाचा सुगंध संपूर्ण घरात पसरतो. अशा प्रकारे तुम्ही लिंबाचे क्लिनर वापरून तुमच्या फरशीची चमक वाढवू शकता.
- याशिवाय, तुम्ही व्हिनेगर फ्लोअर क्लिनरदेखील वापरू शकता. यासाठी तुम्हाला फक्त व्हिनेगर घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळायचा आहे, यामुळे फरशी स्वच्छ होते आणि ती पूर्णपणे चमकते.
- तर या टिप्स वापरून पाहा, ज्यामुळे फरशी साफ करणे सोपे होईल. याशिवाय तुम्ही ते बनवून बराच काळ साठवू शकता.
First published on: 13-02-2025 at 18:56 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not leave black yellow stains on white floors use this simple solution sap