फणस खायला आवडतो का?; जाणून घ्या त्याचे आरोग्यासाठी असणारे आश्चर्यकारक फायदे

फणसामध्ये असलेले पोषक तत्व तुमची पचनसंस्था, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात.

फणस खायला आवडतो का?; जाणून घ्या त्याचे आरोग्यासाठी असणारे आश्चर्यकारक फायदे
फणस खाण्याचे फायदे ( फोटो : file photo )

Health Benefits of Jackfruit: पिकलेला फणस खायला जसा गोड लागतो तसाच कच्या फणसाची भाजी देखील चविष्ट लागते. त्यामुळे फणसाला भाजी म्हणायचे की फळ, हा संभ्रम बहुतांश लोकांच्या मनात कायम आहे. मात्र, फणसाला काहीही म्हणा, त्याचे आरोग्यासाठी असणारे फायदे भरपूर आहेत. फणसात असलेले पोषक घटक तुमची पचनसंस्था, हृदय आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवतात, तसेच मधुमेह आणि ॲनिमियापासून देखील बचाव करण्यासाठी फायदेशीर असतात. चला तर मग जाणून घेऊया फणस खाल्ल्याने आरोग्यासाठी कोणते फायदे होतात.

फणस खाल्ल्याने मिळणारे फायदे

ॲनिमियापासून बचाव

ॲनिमियाच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी फणसाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. जेव्हा शरीरात लोहाची कमतरता होते, त्यावेळी व्यक्ती ॲनिमियाची शिकार बनते. अशा स्थितीत फणसामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणामुळे व्यक्तीला फायदा होतो. त्यामुळे हा आजार असणाऱ्या लोकांनी फणसाचे सेवन करावे, जेणेकरून त्यांची ॲनिमियाची समस्या बरी होईल.

उच्च बीपीपासून सुटका

जॅकफ्रूटमध्ये आढळणारे पोटॅशियम हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करते आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना देखील फायदा देते. शरीरात सोडियमचा प्रभाव जास्त झाला कि रक्तदाब वाढू शकतो. फणस खाल्ल्याने सोडियमचा प्रभाव कमी करण्यास देखील मदत होऊ शकते, त्यामुळे उच्च बीपी असणाऱ्या व्यक्तींनी फणस नक्की खावा.

( हे ही वाचा : वजन कमी करण्यासाठी काकडी आहे उपयुक्त; जाणून घ्या केव्हा आणि कसे खावे)

पचनसंस्था चांगली होते

जर तुमची पचनसंस्था कमकुवत असेल तर पिकलेल्या फणसाचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते . जॅकफ्रूटमध्ये विरघळणारे आणि अघुलनशील फायबर हे दोन प्रकारचे फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यामुळे पिकलेल्या फणसाचे सेवन जरूर करावे.

हृदय निरोगी ठेवा

वैज्ञानिक संशोधन सुचवते की जॅकफ्रूटमध्ये असलेले व्हिटॅमिन बी 6 रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. वास्तविक, होमोसिस्टीन हा एक घटक आहे जो हृदयविकाराचा धोका वाढवू शकतो. त्यामुळे जर तुम्ही फणस खात असाल, तर त्यामुळे तुमच्या रक्तातील होमोसिस्टीनची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका टाळता येतो.

(हे ही वाचा : तुम्ही कच्ची भेंडी खाता का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे)

प्रतिकारशक्ती वाढते

जर तुमची प्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर तुम्ही अनेक आजारांच्या आहारी पडू शकता. त्यामुळे जर तुम्ही देखील तुमच्या कमकुवत प्रतिकारशक्तीमुळे वारंवार आजारी पडत असाल तर तुमच्या आहारात पिकलेल्या फणसाचा समावेश करा. जॅकफ्रूटमध्ये उच्च व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार, जॅकफ्रूटचे सेवन केल्याने त्याची अँटिऑक्सिडेंट क्षमता आणि लॅक्टिक अॅसिड वाढते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरोग्यवार्ता : ‘हार्निया’चा स्त्रियांना अधिक त्रास
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी