Viral Video : चहा हा अनेकांचा आवडता विषय होय. आपल्या देशात चहाने दिवसाची सुरुवात होते. अनेक जण दिवसभरात आवडीने तीन ते चार वेळा चहा पितात. चहा अनेकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. आपण घरी चहा बनवतो तेव्हा अनेकदा चहा चुकून उतू जातो. काही लोकं गॅसवर चहा ठेवतात पण थोडे जरी लक्ष नसले की चहा लगेच उतू जातो. त्यामुळे गॅसवर चहा करताना नीट लक्ष द्यावे लागते पण आज आम्ही तुम्हाला एक अनोखा जुगाड सांगणार आहोत. या जुगाडच्या मदतीने चहा चुकूनही उतू जाणार नाही.
या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हायरल व्हिडीओमध्ये चहा उतू जाऊ नये म्हणून एक भन्नाट ट्रिक सांगितली आहे. ही ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सहसा दूध उतू जाऊ नये म्हणून आपल्याला अनेक सोप्या ट्रिक्स सोशल मीडियावर दिसतात पण चहा उतू जाऊ नये, म्हणून सांगितलेली ही ट्रिक खूप दूर्मिळ आहे. ही ट्रिक जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणी गॅसवर चहा करताना दिसत आहे. पुढे ती चहा उतू जाऊ नये म्हणून एक अनोखी ट्रिक सांगते. लाटण्याचा वापर करताना तुम्हाला व्हिडीओत दिसेल. चहाच्या पातेल्यावर ही तरुणी लाटणे ठेवते. चहा जेव्हा उकळून वर येतो तेव्हा लाटण्यामुळे चहा उतू जात नाही. याचं प्रात्यक्षिक सुद्धा ती या व्हिडीओमध्ये करुन दाखवते. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही ही सोपी ट्रिक वापरू शकता.

हेही वाचा : “चंद्र झोपला नाही…” अंगाई गीत ऐकताना चिमुकली मध्येच म्हणाली, पाहा मजेशीर VIDEO

official_ramandeepkaur या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “निन्जा चहा टेक्निक” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारलेय, “दूधावर पण असेच लाटणे ठेवू शकतो का?” तर एका युजरने लिहिलेय, “खूप चांगली ट्रिक आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “वाह! काहीतरी नवीन शिकायला मिळाले.”

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do your tea spill while boiling try this jugaad for never spilling tea video goes viral ndj