Early Dinner Benefits In Marathi: आपल्यातील अनेकांना सकाळी उठल्यावर अपचन, गॅसचा त्रास होतो. यासाठी लवकर जेवणाचा सल्ला तज्ज्ञ आणि डॉक्टर देतात. पण, आपल्यातील अनेकांना संध्याकाळी लवकर जेवणे शक्यच नसते. अनेक जण संध्याकाळी ७ वाजता तर चहाचे सेवन करतात. बरेच जण ७ वाजता ऑफिसमधून सुटतात. तर काही जण तर ७ वाजता ऑफिसमध्येच असतात. पण, संध्याकाळी लवकर जेवणाचे फायदे ऐकून तुम्ही ७ वाजता नाही. पण, स्वतःला लवकर जेवणाची सवय तर नक्कीच लावून घ्याल.
संध्याकाळी लवकर जेवण्याचे फायदे? (Benefits Of Early dinner)
अन्न पचण्यास मदत – रात्री लवकर जेवल्याने पचनसंस्थेला झोपण्यापूर्वी अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळतो. यामुळे अपचन, आम्ल आणि पोटफुगीचा धोका कमी होतो, ज्यामुळे रात्री चांगली झोप येण्यास मदत सुद्धा होते.
रक्तातील साखरेची पातळी सुधारते – जेव्हा तुम्ही लवकर जेवता तेव्हा ते रात्रीच्या वेळी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते . जेव्हा तुम्ही रात्री उशिरा जेवत नाही तेव्हा तुमची इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते, ज्यामुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होतो.
वजन कमी करण्यात मदत – रात्री लवकर जेवल्याने तुमच्या शरीराला सकाळच्या नाश्त्यापूर्वी जास्त वेळ उपवास करण्याची संधी मिळते. यामुळे तुमचे चयापचय नियंत्रित होण्यास मदत होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर – रात्री उशिरा जेवल्याने रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. जेव्हा तुम्ही संध्याकाळी ७ वाजेपर्यंत जेवता तेव्हा तुमच्या शरीराला रात्री विश्रांती मिळते, ज्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
तुमच्या शरीरात एक अंतर्गत घड्याळ असते ज्याला सर्केडियन रिदम म्हणतात आणि ते शरीराच्या नैसर्गिक झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्राचे नियमन करते. याचा तुमच्या शारीरिक, मानसिक आणि वागण्याच्या सवयींसह तुमच्या एकूण आरोग्यावर परिणाम करतात . म्हणूनच, सर्केडियन रिदमनुसार तुमची दिनचर्या तयार करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे, तुम्ही नेहमी तुमच्या शरीराच्या घड्याळानुसार जेवण केले पाहिजे. याचा अर्थ तुम्ही तुमचे रात्रीचे जेवण सूर्यास्ताच्या आधी, म्हणजे संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी खाल्ले पाहिजे. जेव्हा तुम्ही संध्याकाळी ७ वाजण्यापूर्वी जेवण करता तेव्हा त्याचा तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.