भारतातील सणांमध्ये दहीहंडीला वेगळंच महत्त्व आहे. श्रीकृष्णाचा हा सण म्हणजे धैर्य, एकता आणि उत्साहाचा सोहळा. गोकुळातील बाललीलांची आठवण करून देणारा हा जल्लोष आजही साऱ्या गावोगावी आणि शहरोगावी मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. आध्यात्मिक महत्त्व, भक्तिपूर्ण, सामाजिक रूप, एकतेचा, व्यवस्थापकीय कौशल्य दाखवणारा सण म्हणजे गोपाळकाला.दरवर्षी कृष्णांलीलांची आठवणीत तरुण एकत्र येऊन एकावर एक उभे राहून मानवी मनोरा तयार करतात अन् दहीहंडी सण साजरा करतात. “गोविंदा आला रे आला” या जयघोषाने वातावरण दुमदुमून जातं, आणि सर्वत्र फक्त भक्ती, आनंद आणि मैत्रीचीच गोडी पसरते. या दिवशी तरुण एकत्र येतात एकावर एक गोविंदाना उभे केले जाते आणि उंचावर बांधलली दहीहंडी फोडली जाते. गोपाळकाला आणि दहीहंडीच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजनांना आणि मित्र मंडळीना पाठवा.

गोपाळकाला आणि दहीहंडी निमित्त खास शुभेच्छा (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘गोविंदा रे गोपाळा..

यशोदेच्या तान्ह्या बाळा,

घरात नाही पाणी घागर,

उतानी रे गोपाळा..’

भगवान श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहो आणि तुमचं जीवन गोडी, आनंद आणि समृद्धीने भरून जावो. दहीहंडीच्या शुभेच्छा!

एकता, मैत्री आणि उत्साहाचं प्रतिक असलेल्या दहीहंडी सणाच्या मंगलमय शुभेच्छा!

दहीहंडी म्हणजे श्रम, साहस आणि ऐक्याचा उत्सव – तोच आनंद तुमच्या जीवनातही फुलत राहो.

गोपाळकाला आणि दहीहंडी निमित्त खास शुभेच्छा (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“गोविंदा आला रे आला!” आनंद, उत्साह आणि मैत्रीच्या गजरात साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

कृष्णाच्या बासरीच्या गोड स्वरांसारखं तुमचं आयुष्यही मंगलमय आणि सुरेल होवो. दहीहंडी शुभेच्छा!

साखरेपेक्षा गोड, दुधासारखं पवित्र आणि दह्यासारखं थंड जीवन लाभो.

गोविंदांच्या जयघोषाने घराघरात सुख, शांती आणि समाधान नांदो.

गोपाळकाला आणि दहीहंडी निमित्त खास शुभेच्छा (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“गोविंदा रे गोपाळा” या आनंदी आरोळ्यांनी तुमच्या जीवनात यशाचं पर्व सुरू होवो.

मित्रत्व, श्रद्धा आणि एकतेचं प्रतिक असलेल्या दहीहंडी उत्सवाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!

“गोपालकाला”च्या मंगल सोहळ्यात तुमचे आयुष्य श्रीकृष्णाच्या मुरलीसारखे गोड आणि मंगलमय होवो!

प्रेम, मैत्री आणि ऐक्य यांचा संदेश देणाऱ्या गोपालकालेच्या शुभेच्छा!

गोपाळकाला आणि दहीहंडी निमित्त खास शुभेच्छा (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गोपाळकाला म्हणजे भक्ती, आनंद आणि स्नेहाचा उत्सव – तो तुमच्या आयुष्यातही सुख-समृद्धी घेऊन येवो.

दही-भातासारखी गोडी आणि श्रीकृष्णासारखे निरागस हास्य तुमच्या घरात नांदो! गोपाळकाला मंगलमय होवो.

श्रीकृष्णाच्या नामस्मरणाने आणि या सणाच्या प्रसादाने घराघरात आनंदाचा वर्षाव होवो!

गोपाळकाला तुमच्या कुटुंबात प्रेम, एकता आणि समृद्धी घेऊन येवो ((सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम))

गोपाळकाला तुमच्या कुटुंबात प्रेम, एकता आणि समृद्धी घेऊन येवो

दहीकाला, मैत्री आणि प्रेमाच्या सणात जीवन अधिक सुंदर आणि मंगलमय होवो – शुभेच्छा!

कृष्णाच्या बासरीच्या गोड स्वरांप्रमाणेच तुमचं जीवनही सुरेल आणि गोड होवो.

गोपाळकाला आणि दहीहंडी निमित्त खास शुभेच्छा (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

गोकुळाच्या आनंदी गोविंदासोबत हा सण तुमच्या जीवनातही सुख, शांती आणि भरभराट घेऊन येवो.