Dasara Wishes 2025: हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला दसरा सण साजरा केला जातो. दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, असे मानले जाते.

यंदा दसरा २ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. पौराणिक कथांनुसार, या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला. त्या विजयाचा दिवस म्हणजे विजयादशमी. म्हणून हा दिवस सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो. तर दुर्गामातेने नऊ दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा वध करून धर्म आणि सदाचाराचे रक्षण केले. त्यामुळे या दिवशी शक्तीचा दुष्टावर विजय साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी आपल्यातील वाईट सवयी, गुण मागे टाकून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघा, अशी शिकवण हा सण देत असतो.

पारंपरिक पद्धतीनुसार, दसऱ्याच्या दिवशी नवीन कामांची सुरुवात केली जाते. शस्त्रपूजा, वाहनपूजा केली जाते. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी, सर्वच जण या दिवशी आपापल्या साधनांची पूजा करतात. महाराष्ट्रात दसऱ्याला “सोनं वाटणे” ही प्रथा आहे. अपराजिता (झेंडू/आघाडा) वनस्पतीची पाने “सोनं” मानून ती एकमेकांना देऊन शुभेच्छा दिल्या जातात.

दसऱ्याच्या या पवित्र सणानिमित्त तुम्ही तुमच्या प्रियजनांना, नातेवाइकांना प्रत्यक्ष भेटू शकत नसला तरी WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून शुभेच्छा नक्की देऊ शकता. या सणानिमित्त तुमच्यासाठी खास दसऱ्याच्या काही हटके शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

दसऱ्याच्या शुभेच्छा (Happy Dasara Wishes in Marathi)

सांगता नवरात्रीची
जल्लोष विजयाचा,
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा…
दसऱ्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेऊनी आली विजयादशमी
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख-समृद्धी लाभो तुमच्या जीवनी…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वाईटावर चांगल्याची मात
महत्त्व या दिनाचे असे खास,
जाळोनिया द्वेष – मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

उत्सव आला विजयाचा, दिवस सोनं लुटण्याचा
नवं जुनं विसरून सारे फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी, काढू रांगोळी अंगणी
करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनांची…
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा!

निसर्गाचं दान, आपट्याचं पान
त्याला सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभेच्छा मराठी (Dussehra Wishes Marathi)

लाखो किरणांनी उजळल्या दिशा
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार आणि भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे,
करुन सिमोल्लंघन
साधूया लक्ष विकासाचे…
विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

दसऱ्याच्या शुभेच्छा (Dussehra Quotes Marathi)

आला आला दसरा,
दु:ख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा
साजरा करु दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दारी झेंडूची फुले, हाती आपट्याची पाने,
या वर्षी लुटूयात निरोगी आरोग्याचे सोने…
दसऱ्याच्या सर्वांना शुभेच्छा!

विश्वासाचे नाते, प्रेमाचे बंध,
सोन्यासह वाढू दे दसऱ्याचा आनंद
दसऱ्यानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!