Home Remedies for High Cholesterol: आजच्या धकाधकीच्या आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्यानं वाढत आहे. चुकीचं खाणं, कमी हालचाल व जंक फूड (अस्वास्थ्यकर किंवा पोषणहीन अन्न) याेमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचत जाते. खराब कोलेस्ट्रॉल ही एक प्रकारची चरबी आहे, जी शरीरात वाढते आणि त्यामुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे पक्षाघात, हृदयविकाराचा झटका, टाईप-२ मधुमेह यांसारखे अनेक आजारही वाढतात आणि मग जीवाला धोकाही निर्माण होतो. पण निसर्गात अशी काही हिरवी संपत्ती आहे, जी ही सगळी घाण बाहेर टाकून तुमचं हृदय निरोगी ठेवू शकते.
हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, काही नैसर्गिक हिरव्या पदार्थांमध्ये असे काही घटक असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून “चांगलं कोलेस्ट्रॉल” वाढवतात. चला जाणून घेऊ या, त्या ५ हिरव्या गोष्टी कोणत्या आहेत, ज्या रोजच्या आहारात घेतल्यास तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचा निचरा अगदी नैसर्गिकरीत्या होऊ शकतो.
‘या’ ४ हिरव्या गोष्टी ठेवतील बीपी आणि कोलेस्ट्रॉल दोन्ही नियंत्रणात
१. द्राक्षे
द्राक्षांमध्ये हायड्रॉक्सी सिन्नामेट्स नावाचे फाइटोन्यूट्रिएंट्स असतात, जे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. सकाळी काही द्राक्षं खाणं किंवा त्यांचा रस पिणं हे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे फळ रक्तदाब नियंत्रित ठेवतं आणि हृदयविकाराचा धोका कमी करतं.
२. ब्रोकोली (हिरव्या फुलकोबीसारखी भाजी)
ब्रोकोली ही फायबर, व्हिटॅमिन्स आणि खनिजांनी समृद्ध अशी सुपरफूड भाजी आहे. ती रक्तवाहिन्यांमधील चरबी कमी करून, हृदयाची कार्यक्षमता वाढवते. सलाड किंवा सूपच्या रूपात रोज ब्रोकोलीचा समावेश केला, तर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
३. अॅव्होकॅडो
अॅव्होकॅडोमध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स ही हृदयासाठी चांगली चरबी मानली जाते. ती खराब कोलेस्ट्रॉल कमी करून, रक्तातील चांगल्या चरबीचे प्रमाण वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका घटतो आणि त्वचाही तजेलदार राहते.
४. हिरव्या भाज्या
पालक, मेथी, केल, चोलाई व कोलार्ड साग यांसारख्या भाज्या फायबर, लोह, कॅल्शियम व व्हिटॅमिन के यांनी भरलेल्या असतात. या भाज्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून रक्तशुद्धी करतात आणि कोलेस्ट्रॉलचा समतोल राखतात.
औषधात नव्हे, तर निसर्गातच कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा रामबाण उपाय लपलेला आहे. रोजच्या आहारात या चार हिरव्या गोष्टींचा समावेश करा.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञ / डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)