आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात बहुतेकजण सकाळची न्याहरी करण टाळतात. पण, ही टाळाटाळ तुमचे आरोग्य बिघडवू शकते, हे तुम्हाला माहित आहे का? सकाळी न्याहरी केल्यास तुम्ही उत्साही राहता आणि काम करण्याची शक्तीही मिळते. त्यामुळे एकवेळ दुपारी जेवू नका, पण न्याहरी जरूर करा. वजन कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तर, काही जण  ऑफिसला निघण्याच्या घाईमुळे सकाळच्या नाश्त्याला सुट्टी देतात. पण, न्याहरी न घेता दिवसाची सुरुवात करणे योग्य नाही. तसेच, न्याहरी न करण्याने हृदयविकाराचा आणि उच्च रक्तदाबाचाही धोका बळावण्याची शक्यता आहे.
ताजी फळे, मोड आलेली कडधान्य, ओट किंवा पोळी-भाजी, टोस्ट यांसारखा आरोग्यदायी पोशक आहार चांगला असतो. यामुळे दिवसभर ताजेतवाणे राहता येते. रोज नियमितपणे संतुलित आहार घेण्यासाठी अनेक जण काटेकोरपणे पालन करतात. तर काही जणांना याचे फारसे महत्त्व वाटत नाही. आरोग्याची काळजी घेण्यासाठी चौरस आणि संतुलित आहार जेवढा महत्त्वाचा तेवढेच रोजच्या रोज सकाळची न्याहरी आवश्यक आहे.
जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर न्याहरी करणे टाळू नका. अगदी जास्त प्रमाणात नाही पण निदान थोडे तरी न्याहरीमध्ये खावे. घरी वेळ नसल्यास ऑफिसमध्ये पोहचल्यावर न्याहरी करावी.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Having a small breakfast can help you