नवी दिल्ली : रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) किंवा रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. भारतात विशेषत: स्त्रियांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे गर्भवती आणि स्तनदा मातांनी पोषक आहारात रक्तातील लोहघटक वाढवणाऱ्या आहाराचाही समावेश करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हरभरा किंवा किंवा काळय़ा चण्यांत याचे मुबलक प्रमाण असते. गर्भावस्थेत पोषणमूल्ये असणारे लोहघटक, तंतूयुक्त आहार, कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे मिळणे गर्भवती व गर्भाच्या पोषणासाठी महत्त्वाचे असते. त्यासाठी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने दुग्धजन्य पदार्थ, दूध, भाज्या, फळे, कडधाने, सुकामेवा,तसेच ज्यांना शक्य आहे त्यांनी मांसाहार करावा.आहारतज्ज्ञांच्या मते हरभरे-काळय़ा चण्यांमुळे रक्तक्षय रोखण्यास मदत होते. त्यामुळे त्याचा समावेश असलेला आहार गर्भवती व स्तनदा मातांसाठी लाभदायक असतो.

काळय़ा चण्यांत लोहघटकांसह तंतुमय घटकही मोठय़ा प्रमाणावर असतात. त्यामुळे पोट साफ राहते. पोटाच्या आरोग्यासह मधुमेह रोखण्यासही त्यांचा उपयोग होतो. त्यांच्यात नैसर्गिक वनस्पतिजन्य प्रथिने असतात. त्यामुळे केसगळती रोखण्यास मदत होते. काळय़ा चण्यांच्या आहाराने त्वचेचे आरोग्यही चांगले  राहते. काळय़ा चण्यांसह आहारात टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरचीचा समावेश असल्यास त्यातील मँगेनिज क्षारांमुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. त्वचा व आरोग्य चांगले राहते. उकडलेले काळे चणे, कापलेले टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरचीच्या साह्याने तयार केलेल्या आहारात वरून लिंबू पिळून घेतल्यास शरीराला उपयुक्त लोहघटक मिळण्यास मदत होते. हिरव्या फळभाज्या, पालेभाज्यांतून जीवनसत्त्वे, लोह, तंतुमय पदार्थ मुबलक प्रमाणात मिळतात. ताजी फळे खाल्ल्याने त्यातून अत्यावश्यक जीवनसत्त्वे, क्षार, ऑक्सिडीकरण विरोधी घटक (अँटी ऑक्सिडंट) हे घटक मिळतात. गर्भवतींसाठी ते लाभदायक असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health news iron rich diet is important for pregnant women zws