आपल्या त्वचेबाबतीत सर्वजण चिंतित असतो. धूळ, प्रदुषण आणि ऊन यामुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहचत असते त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषत:चेहऱ्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, आपला चेहरा स्वच्छ करण्याचा एक योग्य मार्ग आहे ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फायदे मिळू शकतात आणि कोणतेही हानिकारक दुष्परिणाम टाळता येतात. अशा प्रकारे, आपल्यापैकी बरेच जण चेहरा धुताना करत असू शकतो काही सामान्य (तरी टाळता येण्याजोग्या) चुका करू शकतात. योग्य क्लिंझरने चेहरा धुणे ही चांगल्या स्किनकेअर रूटीनची पहिली पायरी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डर्माटॉलॉजिस्ट डॉ. गितिका मित्तल गुप्ता यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये चेहरा धुताना होणाऱ्या काही सामान्य चूकांबाबत माहिती सांगितली आहे.

चेहरा धुताना होणाऱ्या काही सामान्य चूका

१. अस्वच्छ हातांनी चेहरा धुणे
२. मेकअप साफ न करणे
३. चुकीचा क्लिंझर वापरणे
४. अतिशय थंड आणि गरम पाणी वापरणे
५. ६० सेंकदापर्यंत चेहरा न धुणे
६. जास्त क्लिंझर वापरणे
७. चेहरा जोरजोरात घासणे
८. वॉशक्लोथ किंवा वाइप न वापरणे
९. आवश्यकतेपेक्षा जास्त एक्सफोलिएट करणे
१०. चेहरा साफ करण्यामध्ये सात्यत्य नसणे
११. चेहरा साफ केल्यानंतर मॉइश्चरायझर वगळणे
१२. दिवसातून फक्त एकदाच चेहरा धुणे
१३. कान, नाक आणि हनुवटी साफ न करणे

हेही वाचा : तुमच्या ५ वाईट सवयी तुम्हाला पाडतात आजारी, निरोगी आरोग्यासाठी करा ‘हे’ बदल

चेहरा कसा साफ केला पाहिजे

डॉ. मित्तल यांनी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी हे सांगितले आहे.

१. कोमट पाण्याने चेहरा साफ करा.
२. बोटाने क्लिंझर चेहऱ्यावर लावा.
३. दिवसातून दोनदा, सकाळी एकदा आणि रात्री एकदा चेहरा धुवा.
४. तुम्ही सर्व मेकअप काढत आहात याची खात्री करण्यासाठी तुमचा चेहरा धुण्यासाठी किमान 60 सेकंद घालवणे महत्त्वाचे आहे.
५. चेहरा धुतल्यानंतर तो मुलायम कापडाने साफ करा.
६. सौम्य, pH-संतुलित आणि तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य असा क्लिंझर निवडा

नेहमी चांगल्या आणि प्रभावी स्किनकेअर रूटीनसह चेहरा धुवा. दिवसा टोनर, सीरम, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरा. रात्री, रेटिनॉल आणि मॉइश्चरायझर वापरा.

आपण आपला चेहरा किती वेळा धुवावा?

इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना, हैदराबादच्या केअर हॉस्पिटल्स हाय-टेक सिटीच्या, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, डॉ. स्वप्ना प्रिया सांगतात की, तुम्ही तुमचा चेहरा दिवसातून दोनदा धुवा- एकदा सकाळी आणि एकदा झोपण्यापूर्वी. सकाळी तुमचा चेहरा धुतल्याने तुमच्या त्वचेवर रात्रभर साचलेले जास्तीचे तेल आणि घाम काढून टाकण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा धुतल्यामुळे तुमच्या त्वचेवर दिवसभर साचलेला मेकअप, धूळ आणि प्रदूषण काढून टाकण्यास मदत करते.”

हेही वाचा : शिंकायचंय पण शिंकता येईना? ‘हे’ उपाय करुन पाहा; नाक होईल साफ मग, घ्या मोकळा श्वास

तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लिंझरमध्ये शोधा

नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कॉस्मेटिक डर्मेटोलॉजी वरिष्ठ सल्लागार डॉ कल्पना सारंगी यांनी इंडियन एक्सप्रेससोबत बोलताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार क्लिंझर निवडताना तुम्ही कोणते घटक पहावेत हे सांगितले आहेत.

कोरडी त्वचा

कोरडी त्वचा असलेल्यांसाठी, कोरफड, ओट्सचे जाडे भरडे पीठ, डायमेथिकोन आणि लॅनोलिन सारखे घटक असलेले फेस वॉश शोधा, जे त्वचेला ओलावा आणि मुलायम करण्यास मदत करतात.

तेलकट त्वचा

सॅलिसिलिक ऍसिड, ग्लायकोलिक ऍसिड आणि विच हेझेल सारखे घटक तेल उत्पादन नियंत्रित करण्यासाठी आणि छिद्रांचे स्वरूप कमी करण्यासाठी प्रभावी आहेत

(कोरडी आणि तेलकट) संयोजन त्वचा

तेलकटपणा आणि कोरडपणा दोन्हीचे संयोजन असलेल्या त्वचेसाठी, नियासिनमाइड, ग्लिसरॉल, पॅन्थेनॉल आणि प्रोपीलीन ग्लायकोलची शिफारस केली जाते कारण ते त्वचेच्या आर्द्रतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करतात

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do yo know proper way to clean the face know how many times a day you should wash your face