Ghee Coffee Benefits: अनेकांच्या दिवासाची सुरुवात चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय होत नाही. भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. पण, काही लोक कॉफीमध्ये तूप घालून पितात. तिला बुलेटप्रूफ कॉफी, असेही म्हटले जाते. असे मानले जाते की, त्यांनी अशी कॉफी प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. त्याशिवाय वजनही कमी करण्यासही मदत होते. जर तुम्ही तीन महिने सलग तूप मिसळलेली कॉफी प्यायलात, तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? याबाबत आपण सल्लागार, आहारतज्ज्ञ व मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्याकडून जाणून घेऊ…
तूप वजन कमी करण्यास मदत करते का?
कनिका मल्होत्रा म्हणतात की, तुपामध्ये अनेक आवश्यक फॅटी अॅसिड असतात. जसे की कन्जुगेटेड लिनोलिक अॅसिड (CLA) इ. यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होण्यास आणि वजन नियंत्रित होण्यास मदत होते. त्याशिवाय तुपामध्ये आढळणारा शॉर्ट-चेन फॅटी अॅसिड ब्युटायरेट हा आणखी एक असा घटक आहे, जो आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि पचन सुलभ करण्यास मदत करतो. तुपाबरोबर कॉफी प्यायल्याने आरोग्यदायी फायदे होऊ शकतात; परंतु यासाठी शुद्ध तूप निवडणे महत्त्वाचे आहे.
जास्त तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो?
मल्होत्रा म्हणाल्या की, तुपामध्ये कॅलरीज खूप जास्त असतात. त्यात भरपूर चांगले फॅट्स असतात. ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते. कारण- शरीर जास्त कॅलरीजचे चरबीत रूपांतर करू शकते. त्यामुळे लठ्ठपणासह अनेक आजार होऊ शकतात.
कॉफीमुळे ऊर्जा आणि एकाग्रता वाढते
मल्होत्रा स्पष्ट करतात की, कॉफी व तुपातील कॅफिन ऊर्जा आणि चयापचय वाढविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते. कॅफिन हे एक असे उत्तेजक आहे, जे ऊर्जा, लक्ष व सतर्कता वाढवते.
दररोज तूप असलेली कॉफी कोणी पिऊ नये?
उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी आणि पचनाच्या समस्या असलेल्यांनी तूप असलेली कॉफी पिऊ नये.
वजन नियंत्रणाबद्दल जागरूक असलेल्यांनी आणि काही विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांनीही तूप असलेली कॉफी पिऊ नये.