जिममध्ये व्यायाम करणाऱ्या व्यक्तींना वजन उचलण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये या व्यक्तींना त्यांच्या क्षमतेनुसार वजन उचलण्याचे मार्गदर्शन केले जाते. आपण अधिकाधिक फिट व्हावे यासाठी काहीजण क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये कधीकधी त्यांना दुखापतही होते. त्यामुळे तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच त्याचा सराव करावा असा सल्ला दिला जातो. व्यायाम करताना किती वजन उचलावे याबाबत एका अभ्यासातून आश्चर्यकारक खुलासा करण्यात आला आहे. काय आहे हा खुलासा जाणून घ्या.
‘एडिथ कोवन युनिव्हर्सिटी’मधिल संशोधकांनी केलेल्या एका अभ्यासामध्ये व्यायाम करताना वापरल्या जाणाऱ्या वजनांबाबत एक खुलासा करण्यात आला आहे. ‘वजन करताना आपण किती वजन उचलतो यापेक्षा ते वजन कशाप्रकारे खाली ठेवतो यावर जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे’ असे या अभ्यासामध्ये नमूद करण्यात आले आहे.
आणखी वाचा : हिवाळ्यात मनुके खाणे आरोग्यासाठी ठरेल वरदान! जाणून घ्या याचे अनेक फायदे
या संशोधनानुसार ज्या व्यक्ती वजन उचलतात आणि खाली ठेवतात त्यांचाएवढाच फायदा ज्या व्यक्ती फक्त वजन खाली ठेवतात त्यांना होऊ शकतो. या अभ्यासासाठी काही जणांची चार गटामध्ये विभागणी करण्यात आली. यातील तीन गटांना पाच आठवडयांसाठी आठवड्यातून दोनदा वेगवेगळ्या प्रकारे डंबेल कर्ल्स करण्यास सांगण्यात आले. एका गटाला फक्त वजन खाली ठेवण्यास सांगण्यात आले होते, दुसऱ्या गटाला वजन उचलण्यास सांगण्यात आले होते. तिसऱ्या गटाला वजन उचलण्यास आणि खाली ठेवण्यास सांगण्यात आले होते तर चौथ्या गटाला कोणतेच टास्क नव्हते.
याच्या रिझल्ट्समध्ये आश्चर्यकारक खुलासा झाला कमी अधिक फरकाने सर्वांना या प्रकारच्या व्यायामाचा फायदा झाला, पण ज्यांनी फक्त वजन खाली ठेवण्याचा सराव केला त्यांना अधिक फायदा झाल्याचे दिसून आले.
आणखी वाचा : High BP नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश
या दोघांपैकी ज्या गटाने वजन फक्त खाली ठेवले त्यांच्या स्नायूंना आलेली सूज ७.२ टक्के अधिक होती तर ज्यांनी दोन्ही प्रकारे वजन वापरले त्यांच्या स्नायूंमध्ये केवळ ५.४ टक्के सूज दिसून आली