Thicker Eyebrows tips in marathi: काळ्या आणि जाड भुवया तुमच्या सौंदर्यात भर घालतात. यामुळे तुमचे व्यक्तिमत्व वाढते. जर तुम्हाला तुमचा चेहरा थोडा वेगळा दिसावा असे वाटेत असेल तर तुमच्या भुवया जाड करा. नैसर्गिक पद्धतीने भुवया काळ्या आणि जाड करण्याकरता काही घरगुती उपाय करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या भुवया नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी थोडा वेळ आणि संयम आवश्यक असू शकतो, परंतु योग्य टिप्स फॉलो केल्यास नक्की तुमचे आयब्रोज तुम्ही वाढवू शकता.

एरंडेल तेल: भुवया जाड आणि दाट होण्यासाठी एरंडेल तेल लावा. एरंडेल तेल वापरल्याने केसांची वाढ सुधारते. याशिवाय भुवया मजबूत होतात. या तेलामध्ये फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स असे अनेक प्रकारचे गुणधर्म आढळतात आणि ते भुवयांना पोषण देते. याच्या मदतीने भुवया दाट करता येतात.

खोबरेल तेल: डोक्‍यावरील केसांप्रमाणेच भुवयांचे केसही दाट होण्यासाठी खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलामध्ये अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात, जे तुम्हाला तुमच्या भुवया दाट करण्यास मदत करू शकतात.

ऑलिव्ह ऑइल: जाड भुवया मिळविण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी ऑलिव्ह ऑईलचे २ ते ३ थेंब घ्या. आता भुवयांवर लावा आणि सुमारे १०मिनिटे मसाज करा. यामुळे भुवयांची वाढ सुधारेल.

कांद्याचा रस: भुवया काळ्या आणि जाड करण्यासाठी कांद्याचा रस लावा. कांद्याचा रस भुवयांवर लावल्याने भुवया काळ्या आणि दाट होतात. यासाठी १ कांद्याचा रस काढा. आता भुवयांवर लावा आणि काही वेळ राहू द्या. नंतर चेहरा धुवा.

अंड्यातील पिवळ बलक: अंड्यातील पिवळ बलक फेटून ते तुमच्या भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी २०-३० मिनिटे तसेच राहू द्या. अंड्यातील पिवळ बलक प्रोटीनयुक्त असल्याने केसांच्या वाढीस मदत करू शकते.

मेथी दाणे: एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बियांची पेस्ट बनवून भुवयांना लावा. पाण्याने धुण्यापूर्वी ३० मिनिटे तसेच राहू द्या. मेथीच्या दाण्यांमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक ऍसिड असते, जे केसांच्या वाढीस मदत करू शकते.

पेट्रोलियम जेली: तुमच्या भुवयांना थोड्या प्रमाणात पेट्रोलियम जेली लावा आणि काही मिनिटे हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर असेच राहू द्या आणि सकाळी स्वच्छ धुवा. पेट्रोलियम जेली केसांच्या कूपांना मॉइश्चरायझ करण्यात आणि केसांच्या वाढीस मदत करू शकते.

हेही वाचा >> Monkeypox Virus: मंकीपॉक्सची भारतात एन्ट्री! गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी? ऐका डॉक्टर काय सांगतात

टीप: लक्षात ठेवा हे घरगुती उपाय आहेत, तुमच्या त्वचेला यातील कुठल्याही गोष्टीची ऍलर्जी असल्यास आधी वैद्यकीय सल्ला घेणेच योग्य ठरेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is how you can grow your eyebrows faster and thicker 10 tips to make eyebrows thick and pointy natural remedies beauty hacks that will make face glow srk