हिवाळा ऋतूला सुरूवात झाली आहे, त्यामुळे सर्वत्र थंडीचे वातावरण आहे. थंडीमध्ये स्वेटर, मोजे, बूट, जास्त वापरले जातात. नियमितपणे बुटांचा वापर केल्याने त्यामधून दुर्गंधी येण्याची शक्यता असते. या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. यावर काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतात, कोणते आहेत ते उपाय जाणून घ्या.

बुटांमधून दुर्गंधी येण्याचे कारण
दिवसभर किंवा खूप वेळासाठी बूट घातल्यास पायांना घाम येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोजे आणि बुटांमध्ये ओलावा राहण्याची शक्यता असते. यामुळे पाय, मोजे बूट यांमध्ये बॅक्टेरिया तयार होतो. ज्यामुळे बुटांमधून दुर्गंधी येऊ शकते.

आणखी वाचा : Kitchen Hack : गॅसचे बर्नर काळे पडले आहे का? स्वच्छ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

बुटांमधील दुर्गंधी कमी करण्यासाठी करा हे उपाय

घाम शोषणारे मोजे घ्या
बुटांमधून येणाऱ्या दुर्गंधीचे मुख्य कारण घाम आहे, त्यामुळे यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घाम शोषणारे मोजे वापरू शकता. घाम शोषणारे मोजे सर्वत्र सहज उपलब्ध होतात.

बूट आणि इनसोल नियमितपणे स्वच्छ करा
बूट आणि इनसोल नियमितपणे स्वच्छ केल्यास दुर्गंधीपासून सुटका मिळण्यास मदत मिळते.

डियोड्रण्टचा वापर करा
पायांना येणाऱ्या घामामुळे, त्या ओलाव्यामुळे बुटांमध्ये बॅक्टेरिया निर्माण होतात, त्यामुळे पायांना सतत घाम येणार नाही याची काळजी घ्या. यासाठी तुम्ही डियोड्रण्टचा वापर करू शकता. डियोड्रण्टमुळे घामामुळे निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ रोखण्यास मदत होते. असे झाल्यास पायांमधून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवता येईल.