‘होंडा’ने आपली लोकप्रिय स्कूटर Activa 5G ची मर्यादित आवृत्ती (लिमिटेड एडिशन) लाँच केली आहे. स्टँडर्ड अॅक्टिव्हा 5जी च्या तुलनेत नव्या लिमिटेड एडिशनची किंमत 400 रुपयांनी अधिक आहे. लिमिटेड एडिशनमध्ये ड्युअल-टोन कलरशिवाय नवीन स्टायलिश ग्राफिक्स, ब्लॅक रिम, अॅग्जॉस्टच्या वर क्रोम मेटल कव्हर आणि ब्लॅक कलरमध्ये इंजिन आहे.
ही नवी स्कूटर दोन नवीन ड्युअल कलरच्या पर्यायात उपलब्ध असेल. यात ‘पर्ल सेलीन सिल्व्हर कलर’सह ‘पर्ल प्रेशियस व्हाइट’ आणि ‘पर्ल इग्नेयस ब्लॅक’सह ‘स्ट्रोंटियम सिल्वर मेटेलिक कलर’चा पर्याय आहे. लिमिटेड एडिशनच्या दोन्ही व्हेरिअंट्समध्ये (STD आणि DLX) हे कलर उपलब्ध असतील. अनुक्रमे 55 हजार 032 रुपये आणि 56 हजार 897 रुपये इतकी किंमत ठेवण्यात आली आहे.
या स्कूटरमध्ये 109.2cc असलेलं सिंगल-सिलिंडर, एअर कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 8 bhp पावर आणि 5,500 rpm वर 9 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. काही कॉस्मेटिक बदलांव्यतिरिक्त अॅक्टिव्हामध्ये अन्य कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. Honda Activa 5G देशातील सर्वाधिक लोकप्रिय स्कूटरपैकी एक आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून या स्कूटरच्या 30 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री होत आहे. आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 31 लाख 54 हजार 030 युनिट्सची आणि 2018-19 मध्ये 30 लाख 08 हजार 334 युनिट्सची विक्री झाली होती. मात्र, 2017-18 च्या तुलनेत 2018-19 मध्ये या स्कूटरच्या विक्रीत 4.6 टक्के घट झाली आहे. नव्या अवतारात लाँच झाल्याने Honda Activa 5G च्या विक्रीत वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे. दुसरीकडे कंपनी नव्या जनरेशनची बीएस6 इंजिनसह होंडा अॅक्टिव्हा अर्थात Activa 6G च्या निर्मितीची तयारी करत आहे.