How do you get rid of earthworms in a bathroom?: पावसाळ्यात घर कितीही स्वच्छ ठेवलं, तरी बाथरूम साफ करण्याचे राहून जाते. पण पावसाळ्यात बाथरूम साफ करणं गरजेचं आहे. या दिवसात बाथरूम अस्वच्छ असेल तर, त्यात किडे, सरपटणारे प्राणी, पाली, झुरळं, गांडूळ आणि गोम फिरतात . ज्यामुळे बाथरूममध्ये कुबट वास पसरतो. कितीही स्वच्छ ठेवले तरी,किडे, सरपटणारे प्राणी, पाली, झुरळं घरात येतातच. मुख्य म्हणजे बाथरूममध्ये गांडूळ – गोम फार निघतात. त्यांचा उपद्रव नको वाटतो, किळसही येते. त्यांना मारुन टाकणंही नको वाटतं. पण म्हणूनच ते घरात येऊ नयेत म्हणून हे सोपे उपाय नक्की करा.
बेसिन- मोरीतून गांडूळ बाहेर येत असल्यास काय उपाय करावे?
- जाड मीठ/ खडा मीठ – बाथरूममध्ये व टॉयलेट मध्ये पांढरे जाड मीठ म्हणजेच खड्याचे मीठ पसरवून ठेवा. मीठातील क्षार या किड्यांना मारून टाकते.
- डांबर गोळ्या – बाथरूम मध्ये व घरातील नेप्थलीन बॉल म्हणजे डांबर गोळ्या पसारवून ठेवा
- कडुलिंब/ पुदिन्याची पाने – गांडूळ येतात अशा ठिकाणी पुदिन्याची किंवा कडुलिंबाची किंवा दोन्ही एकत्र अशी पाने कुस्कुरून टाका.
- कापूर – शक्य झाल्यास एक दिवस आड घरात कापूर जाळा. नारळाची धुरी केल्यास त्यात कडुलिंबाचा पाला घालावा.
- बोरिक पावडर – बाथरूम व टॉयलेट मध्ये बोरिक पावडर व ब्लिचिंग पावडर टाकून घ्या. या पावडरचा गंध खूप उग्र असतो त्यामुळे एक दिवस आड टाकू शकता.
- व्हिनेगर – प्राणी घरात येणाऱ्या ठिकाणी रात्री एक चमचा व्हिनेगर ओतावे, जेणेकरून त्या गंधाने प्राणी कमी होतील.
- बेकिंग सोडा – आपल्याला ब्लिचिंग पावडरचा उग्र गंध सहन होत नसेल तर पर्यारी आपण बेकिंग सोडा सुद्धा बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवू शकता.
गांडुळांपासून सुटका मिळवण्यासाठी बाथरूम नेहमी स्वच्छ करत राहा. अस्वच्छ बाथरूममध्ये गोम – गांडूळ आपली अंडी घालतात. ज्यामुळे यांचा वावर वाढतो. साचलेल्या पाण्यात किंवा घाणीच्या ठिकाणी गांडूळ जास्त येतात. गांडूळ – गोमपासून सुटका हवी असेल, तर बाथरूमचा वापर झाल्यानंतर नेहमी क्लिन करा.