केळी प्रत्येक ऋतूमध्ये सहज उपलब्ध असतात आणि आरोग्यासाठी ती तितकीच फायदेशीर असतात. अनेकदा डॉक्टर केळी खाण्याचा सल्ला देतात. केळी खाल्ल्यामुळे आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते; पण केळी खरेदी करताना आपण बऱ्याचदा चुका करतो. केळी खरेदी करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत, याविषयी आपण जाणून घेऊ या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- केळी खरेदी करताना केळ्यांचा रंग तपासून घ्यावा. नेहमी पिवळ्या रंगाची केळी खरेदी करावीत.
- केळी खरेदी करताना त्यांचे बारकाईने निरीक्षण करावे. केळ्यांवर काळे डाग आहेत का, हे तपासावे. काळे डाग असणारी केळी कधीच खरेदी करू नयेत. अशी केळी खूप लवकर खराब होतात.
- गरजेपेक्षा जास्त केळी कधीच खरेदी करू नयेत. एकदोन दिवसांपुरतीच केळी खरेदी करा आणि नेहमी ताजी केळी खाण्याचा प्रयत्न करा.
हेही वाचा : गहू घरी जास्त काळासाठी कसा साठवावा? हे सोपे घरगुती उपाय करा, कधीही किड लागणार नाही
- केळी खरेदी करताना त्यांची साइज बघा. केळी थोडी मोठी आणि जाड असावीत. अशा केळ्यांची चव खूप चांगली असते. कारण- ती पूर्णपणे पिकलेली असतात.
- लहान आकाराची केळी कधीच
खरेदी करू नयेत. अशी केळी पिकलेली नसतात आणि अशा केळ्यांचे सेवन केल्यामुळे पोटांशी संबंधित आजार होऊ शकतात. - केळ्यांवर थोडा जरी हिरवा रंग असला तरी अशा केळ्यांचे कधीच
सेवन करू नये. जर तुम्ही अशी केळी खरेदी केलीत, तर ती लगेच खाऊ नयेत. काही दिवसांनंतर ही केळी खावीत.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
First published on: 26-07-2023 at 17:14 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to buy banana carefully note these tips to choose good bananas at the market ndj