How To Clean AirPods & EarPods : आपल्यापैकी बहुतेक जण गाणी ऐकण्यासाठी, कॉलवर बोलण्यासाठी इअरफोन, हेडफोन आणि इअरबड्स वापरतात. चुकून इअरफोन, हेडफोन व इअरबड्स घरी राहिले की, प्रवासात येता-जाता वेळ कसा जाणार याचे टेन्शन आपल्याला येऊ लागते. दररोज आपण यांचा इतका वापर करतो की, तासन् तास कानात घातल्यामुळे आणि ही उपकरणे अस्वछ दिसू लागतात, त्यात घाण जमा होते.

त्यामुळे तासन् तास ही उपकरणे कानांत घातल्यामुळे आणि ती स्वच्छ न केल्यास कानांचे नुकसान होऊ शकते. इतकेच नाही, तर कानांत घाण साचल्याने या उपकरणांमधून येणारा आवाजही कमी होतो आणि कालांतराने ती जुनीसुद्धा दिसू लागतात.

तर आज आपण बातमीतून अशा काही सोप्या पद्धती पाहणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुम्ही घरीच सहजपणे हेडफोन, इअरबड्स व इअरफोन्स स्वच्छ करू शकता…

मायक्रोफायबर कापड – हेडफोन, इअरबड्स व इअरफोन्स स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला प्रथम मायक्रोफायबर कापडाची आवश्यकता असेल. हे कापड कोमट पाण्यात बुडवा. नंतर डिव्हाइसचा बाह्य थरावरील घाण पुसण्यासाठी त्याचा वापर करा.

कापूस – इअरफोन, हेडफोन व इअरबड्समध्ये अडकलेली घाण साफ करण्यासाठी कापूस वापरा. ​​लहान कोपरे आणि ग्रिल्स स्वच्छ करण्यासाठीनच्या कोरड्या किंवा किंचित ओल्या कापसाच्या तुकड्याने अडकलेली घाण काढा. तुम्ही त्यासाठी टूथपिकचाही वापर करू शकता.

कोमट पाणी – इअरबड्समधील बहुतेक घाण ही इअरटिप्समध्ये असते. हेडफोन, इअरबड्स व इअरफोन्सचे रबर किंवा सिलिकॉन इअरटिप्स काढून टाका आणि स्वच्छ करा. नंतर साबण आणि कोमट पाणी लावून पुसून घ्या. आत असलेली कोणतीही घाण जंतुनाशक वाइप्सने स्वच्छ करा. या पद्धतीने केवळ जीवाणू तर नाहीसे होतीलच; पण जुने, घाणेरडे हेडफोन, इअरबड्स आणि इअरफोनदेखील चमकतील.