Best Ways to Get Rid of Mosquitoes : उन्हाळ्याचा ऋतू संपून आता पावसाळ्याने चांगलाच जोर धरला आहे. गरमी जाऊन गारवा आल्याने सर्वजण सुखावलेत. पण पावसाळ्यासोबतच विविध आजार येतात तसेच डासांचा उपद्रवही वाढतो. पावसाळ्याच्या दिवसांत सगळीकडेच डासांचे प्रमाण खूप जास्त वाढलेले असते. हे डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासह अनेक आजार पसरवतात, ज्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना रुग्णालयातही दाखल व्हावे लागू शकते. बहुतांश लोक डास पळवण्यासाठी घरात केमिकलयुक्त धूप, कॉईल किंवा काही स्प्रेचा वापर करतात. पण ते दरवळेस यशस्वी ठरतेच असे नाही, तसेच त्याचे अनेक साईड-इफेक्टसही असतात. अशात आम्ही काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत. केमिकल्स लिक्वीडपेक्षा हे उपाय जास्त प्रभावी आणि सुरक्षित ठरतात.
कडूलिंबाचं तेल – नीलगिरीच्या तेलासारखाच डासांना पळवण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाचाही फायदा होतो. कडूलिंबाचं तेल आणि खोबऱ्याचं तेल समान प्रमाणात मिक्स करा. हे तेल रात्री झोपताना शरीरावर लावा. या तेलाने डास तुमच्या जवळ येणार नाहीत.
कापराचा वापर – चांगली झोप येण्यासाठी आणि डासांना पळवून लावण्यासाठी कापूर जाळण्याचा उपायही चांगला आहे. यासाठी घरात कापूर जाळून दारं-खिडक्या काही वेळासाठी बंद करा. नंतर ते उघडा. जमिनीवर बरेच डास तुम्हाला मेलेले दिसतील.
लसणाने पळवा डास – लसणामध्ये किती फायदेशीर गुण असतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या आजारांना बरं करण्यासाठीही लसणाचा वापर केला जातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, लसणाच्या मदतीने तुम्ही डासांनाही पळवून लावू शकता. लसणामधील सल्फरमुळे डास मरतात. त्यामुळे लसूण लवंगसोबत पाण्यात उकडून घ्या. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये टाकून स्प्रे करा. डासांना नायनाट होईल.
नीलगिरी तेल – डासांना घरातून पळवण्यासाठी नीलगिरीचं तेलही फार फायदेशीर असतं. एक चमचा नीलगिरीचं तेल आणि तेवढाच लिंबाचा रस मिक्स करा. हे मिश्रण शरीरावर लावा. याच्या वासामुळे डास तुमच्या जवळही येणार नाही.
© IE Online Media Services (P) Ltd