आपल्यापैकी बहुतेक सर्वच जण गुगल फोटो वापरतात. यामार्फत अनेक लोक आपले फोटो किंवा व्हिडिओ सेव्ह करतात. पण बऱ्याच वेळा चुकून आपल्याकडून एखादा फोटो किंवा व्हिडीओ डिलीट होतो. तुमचेही असेच काही फोटो किंवा व्हिडीओ चुकून डिलीट झालेत का? मग आता ते पुन्हा कसे मिळवायचे याबाबत आज जाणून घ्या. जर तुम्ही चुकून डिलीट केलेले हे फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला रिस्टोअर करायचे असतील तर यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपी प्रक्रिया सांगणार आहोत. दरम्यान, Google Photos वर रिस्टोरचा पर्याय लगेच दिसत नाही. अशावेळी, तुम्हाला डिलीट झालेले फोटो/व्हिडीओ परत कसे आणता येतील? हे जाणून घेण्यासाठी पुढील काही स्टेप्स फॉलो करा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Google Photos वर असे रिस्टोअर करा फोटो/व्हिडीओ

सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटवर गुगल फोटो अ‍ॅप ओपन करा. इथे तुम्हाला स्क्रीनच्या तळाशी लायब्ररी टॅबचा पर्याय दिसेल. तुम्हाला फक्त या टॅबवर टॅप करायचं आहे. ते ओपन झाल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील. इथे तुम्हाला Trash ओपन करावं लागेल. या फोल्डरमध्ये तुम्हाला सर्व डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ दिसतील. फाइल रिस्टोअर होईपर्यंत त्यासाठीचा वेळ स्क्रीनच्या तळाशी देखील दिसेल.

तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ खाली दोन पर्याय दिसतील. या पर्यायांमध्ये तुम्हाला कायमचं हटवण्याचा एक पर्याय दिसेल तर दुसरा पर्याय रिकव्हर किंवा रिस्टोर करण्यासाठी दाखवला जाईल. आता तुम्ही तुमचे डिलीट केलेले फोटो किंवा व्हिडीओ तिथे दिलेल्या रिकव्हर पर्यायावर क्लिक करून रिस्टोर करू शकता.

‘ही’ आहे अट

तुम्ही यावेळी एक महत्त्वाची बाब जाणून घ्यायला हवी कि, तुम्ही चुकून जो फोटो किंवा व्हिडिओ डिलीट केला आहे त्याला जर ६० दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले असतील तर तुम्ही तो रिस्टोर करू शकत नाही. याचाच दुसरा अर्थ, तुम्ही एखादा फोटो किंवा व्हिडीओ डिलीट केल्यानंतर ६० दिवसांच्या आतच रिस्टोर केला जाऊ शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to restore deleted photos videos google photos gst