दिवाळी जवळ आली की मिठाई आणि फराळाच्या पदार्थांचे वेध लागतात. मग एकमेकांना भेट म्हणून देण्यासाठी किंवा घरी पाहुणे आल्यावर त्यांना देण्यासाठी मिठाईला पसंती दिली जाते. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक जण विकतचे पदार्थ आणण्यालाच प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये मावा, खवा आणि इतर अनेक घटकांची मिठाई असते. मागील काही वर्षांमध्ये मिठाईतून विषबाधा होण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली असतानाच यामधील भेसळ हेच याचे मुख्य कारण असल्याचे दिसते. या मिठाईकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यावर चांदीचा वर्ख किंवा इतरही सजावटीच्या गोष्टी लावल्या जातात. मात्र या वर्खातून होणारी भेसळ आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते. त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा वर्ख भेसळयुक्त असल्यास त्यामुळे मळमळ, उलट्या, जुलाबाचा त्रास होतो. म्हणूनच ही मिठाई खाण्यापूर्वी घरच्याघरी काही सोप्या उपायांच्या माध्यमातून ही भेसळ ओळखणे सोपे असते. त्यामुळे नेमक्या कोणत्या चाचण्या कराव्यात याविषयी…

१. सगळ्यात प्रथम म्हणजे मिठाईचा जवळून जास्त वेळ वास घेऊन पहावा. घरातील आणखी दोन ते तीन जाणकारांना हा वास द्यावा. तसेच मिठाई जवळून पहावी. अनेकदा त्याला भुरा लागलेला असण्याचीही शक्यता असते.

२. मिठाईचा तुकडा घेऊन त्यावर हायड्रोक्लोरिक अॅसिड टाका. त्याला जांभळा रंग आल्यास मिठाईत मेटॅनील यलो रंगाची भेसळ असल्याचे समाजावे. ही चाचणी घरच्या घरी करता येण्यासारखी आहे.

३. मिठाईवरील चांदीचा वर्ख थोडासा जाळा. जर तो काळसर झाला तर तो अ‍ॅल्युमिनियमने भेसळयुक्त झाला आहे असे समजावे. अस्सल चांदीच्या वर्खाचा गोळा होईल.

४. तुम्ही मिठाईवर लावण्यासाठी चांदीचा वर्ख आणला असेल तर तो भेसळयुक्त आहे की नाही हे आधी तपासा. यासाठी तो दोन्ही तळव्यांच्या मधोमध धरून चोळा. जर तो अस्सल असेल तर तो निघून जातो पण जर अ‍ॅल्युमिनियमयुक्त असेल तर त्याचा गोळा होईल.

५. मिठाई खाण्यापूर्वी त्यावर हात फिरवा. जर हाताला चांदीच्या वर्खाचा भाग राहिला तर तो भेसळयुक्त समजावा. कारण अस्सल चांदीचा वर्ख हाताला लागत नाही. त्यामुळे वर्ख हाताला लागला तर त्यामध्ये अ‍ॅल्युमिनियमची भेसळ आहे हे ओळखावे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to test adulteration of sweets at home important tips