तुटलेली हाडे जोडण्यासाठी आता बिनविषारी हायड्रोजेल तयार करण्यात आले असून त्यामुळे हाडे लगेच जुळली जातात. यात अधिक संशोधन झाल्यास सांधेजोडाच्या आजारांमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो. हाडे ही कूर्चा व लिगॅमेंट्सनी जुळलेली असतात व हाडे तुटल्यानंतर लगेच जोडली जात नाहीत, असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यासाठी कृत्रिम आधारासाठी उती वापरल्या जातात. त्यामुळे मऊ उतींची झालेली हानी लगेच भरून येते. मजबूत अशा पदार्थाच्या अभावी हाडे जोडण्यात आतापर्यंत तरी मोठी प्रगती झालेली नाही. जपानमधील होकायडो विद्यापीठाच्या संशोधकांनी जास्त मजबूत, असा दुहेरी काम करणारा डीएनजेल शोधून काढला आहे, त्यामुळे कुर्चाच्या पुननिर्मिती प्रक्रियेत सुधारणा दिसून आली आहे. या जेलमध्ये मुख्य घटक पाणी असल्याने कुठलेही पृष्ठभाग जोडले जाणे अवघड होते. नवीन जेलमध्ये अनेक बाकी समस्या मात्र दूर झाल्या आहेत. संशोधकांनी त्यात हायड्रोख्यापॅटाइट या अकार्बनी संयुगाचा समावेश करून डीएन जेल हाडे जोडू शकेल अशा पद्धतीने तयार केले आहे. त्यासाठी ते कॅल्शियम व फॉस्फेटच्या द्रावणात बुडवावे लागते. एचएपी आवरण असलेले डीएनजेलनंतर सशाच्या सदोष हाडात बसवण्यात आले होते. नंतर चार आठवडय़ात त्याचे हाड अत्यंत मजबूतपणे जोडले गेले. ज्याला आवरण नव्हते, त्या जेलने हाड जोडले गेले नाही. इलेक्ट्रो मायक्रोस्कोपीच्या मदतीने विश्लेषण केले असता हाडाचा नवीन भाग जेलच्या पृष्ठभागात घुसून त्यात मिसळून गेला होता. विषारी नसलेले हायड्रोजेल हे हाडे जोडण्यास उपयुक्तअसले तरी त्याचा उपयोग हायड्रोजेल पदार्थ कुर्चा तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. होकायडो विद्यापीठाचे जियान पिंग गाँग यांनी सांगितले की, एएपी व डीएन जेल यांच्या जोडामुळे हाडासारखीच रचना तयार होते व शरीरावर कमी ताण येतो. कृत्रिम लिगॅमेंट्स जोडले जातात. अॅडव्हान्स्ड मटेरियल या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)