तज्ञांचे मते आपले एकूण आरोग्य शारीरिक आणि मानसिक दोन्ही उत्तम ठरवण्यासाठी अन्न महत्वाची भूमिका बजावते. याचे कारण असे की तुम्ही जे सेवन करता ते तुम्हाला कसे वाटते हे ठरवते. चॉकलेट तुमचा मूड वाढवते हे तुम्ही अनेकदा ऐकले असाल. तर यावेळी जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या मुख्य आहारततज्ञ डेलनाज चंदूवाडिया यांनी संगितले की, कर्बोदकांमध्ये देखील एखाद्याला चांगले वाटण्यासाठी ओळखले जाते. अन्नपदार्थांमध्ये विशिष्ट घटक असतात ज्याच्या सेवनाने तुम्हाला उत्साही वाटू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्याचप्रमाणे अनेक अभ्यासांनी अन्न आणि मेंदूच्या आरोग्यामधील संबंध सिद्ध केला आहे. यावेळी आहारतज्ज्ञ डेलनाज चंदूवाडिया यांनी काही पदार्थ शेअर केले आहेत ज्याने एखाद्याला चांगले वाटण्यास व मूड बूस्ट करण्यास मदत करतात.

कोको किंवा डार्क चॉकलेट

कोको किंवा डार्क चॉकलेट यांमध्ये ट्रिप्टोफॅनचे प्रमाण जास्त आहे जे तुमच्या मेंदूद्वारे सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यासाठी वापरले जाते. सेरोटोनिन हा एक मुख्य संप्रेरक आहे जो तुमचा मूड स्थिर करण्यास मदत करतो.

ग्रीन टी

कॅटेचिन (ईजीसीजी) सारख्या अँटीऑक्सिडंट्सने भरलेले ग्रीन टी जे तुमच्या मेंदूचे कार्य वाढविण्यात मदत करते. तसेच सतर्कता वाढवते. हे शांत राहण्यास आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते.

ओमेगा -3 समृद्ध पदार्थ

ओमेगा -3 समृद्ध पदार्थांचे आहारात समावेश केल्याने त्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. हे एक अत्यावश्यक फॅटी एसिड आहे. ज्यात हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, वजन कमी करण्यास योगदान देते, अँटिऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. यावेळी आहारतज्ञ यांनी सॅल्मन फिश, फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स, नट्स इत्यादी पदार्थांमध्ये ओमेगा -3 असल्याच संगितले. या ओमेगा -3 समृद्ध पदार्थांच्या सेवनाने नैराश्याचा सामना करण्यास मदत करते.

भोपळी मिरची

भोपळी मिरची ही व्हिटॅमिन ए ने भरलेली असून, व्हिटॅमिन बी 6 चा स्त्रोत आहे. तर सामान्य मेंदूच्या विकासासाठी आणि कार्यासाठी आवश्यक पोषक आणि शरीराला सेरोटोनिन आणि नॉरपेनेफ्रिन (मूडवर प्रभाव पाडणारे) हार्मोन्स तयार करण्यास मदत करते.

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथीमध्ये बी व्हिटॅमिन फोलेट असते. फोलेटची कमतरता असल्यास हे सेरोटोनिन, डोपामाइन आणि नोराड्रेनालाईन (मूडसाठी महत्त्वपूर्ण न्यूरोट्रांसमीटर) च्या चयापचयात अडथळा आणू शकते. त्यामुळे आहारात हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असावा.

प्रोबायोटिक्स समृद्ध पदार्थ

प्रोबायोटिक्स समृद्ध पदार्थ हे प्रोबायोटिक बॅक्टेरियाला चालना देण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करतात. किमची, ताक, मिसो, लोणच्याच्या भाज्या, केफिर, दही हे पदार्थ प्रोबायोटिक्सचे समृद्ध स्त्रोत आहेत. यामुळे तुमचा मूड आनंदी राहतो.

नट्स

नट्स मध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फॅटने भरलेले असतात. नट मॅग्नेशियमने समृद्ध असतात. यांच्या सेवनाने तुमचा मूड अगदी आनंदी राहतो. कमी प्रमाणात असलेल्या मॅग्नेशियममुळे तुमच्यात नैराश्याचा धोका वाढतो.

कॅफीन पेये

कॅफीनयुक्त पेय प्यायल्याने डोपामाइन रिलीज ट्रिगर करून कार्यप्रदर्शन आणि तुमचा मूड सुधारण्यास मदत करतात. अशातच कॉफी तुम्हाला जर चिडचिडे, उदास, निद्रिस्त बनवते किंवा इतर प्रतिकूल परिणाम घडवते, तर कॉफीचे सेवन टाळा. कॅफीनमुक्त असलेले पेये किंवा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी सारखे लोअर-कॅफीन पेये हा एक चांगला पर्याय आहे, ज्याचे तुम्ही सेवन करून तुमचा मूड बूस्ट करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Include these foods in your diet to help maintain a good mood scsm