Cockroaches Killer Tips: पावसाळ्यात झुरळांची खूप दहशत वाढते. ही झुरळे कधी स्वयंपाकघरात, तर कधी बाथरूममध्ये फिरताना दिसतात. अनेकदा बाजारातील स्प्रे वापरूनही त्यांचा नायनाट होत नाही. पण, जर तुम्ही झुरळांना पळवून लावण्यासाठी काही घरगुती उपाय करण्याचा विचार करीत असाल, तर आम्ही तुम्हाला नऊ प्रभावी उपायांबद्दल सांगणार आहोत.

झुरळांना पळवून लावण्यासाठी नऊ प्रभावी उपाय

लसूण, कांदा व मिरचीचा स्प्रे

लसूण, कांदा व लाल मिरची पाण्यात उकळून, एक स्प्रे तयार करा आणि झुरळांचा वापर असलेल्या ठिकाणी शिंपडा. या तीव्र वासाने झुरळांचा नायनाट होईल.

बेकिंग सोडा व साखर

बेकिंग सोडा व साखर वापरून स्प्रे बनवा. दोन्ही घटक समान प्रमाणात मिसळा.झुरळांची शक्यता असलेल्या ठिकाणी त्याची फवारणी करा.

बोरिक अॅसिड

बोरिक अॅसिड हे झुरळांसाठी प्रभावी घरगुती उपाय म्हणून वापरले जाते. सर्वोत्तम परिणामांसाठी या पावडरची थोडीशी मात्रा कोपऱ्यात आणि जमिनीवर शिंपडा.

तमालपत्र

तमालपत्राचा तीव्र गंध झुरळांना आवडत नाही. त्यामुळे तमालपत्राची पाने कुस्करून घ्या आणि जिथे झुरळे आहेत तिथे पसरवून ठेवा. त्यामुळे झुरळांवर त्या वासाचा प्रभाव पडून, ती स्वयंपाकघरापासून दूर राहतील.

कडुलिंबाचे तेल

कडुलिंबाचे तेल किंवा त्याच्या पावडरीची झुरळांचा नायनाट होण्यास मदत होते. कडुलिंबाचे तेल वापरण्यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये थोठ्या प्रमाणात कडुलिंबाचे तेल पाण्यात मिसळा आणि ज्या ठिकाणी हे कीटक दिसले आहेत, त्या ठिकाणी त्याची फवारणी करा.

साबण आणि पाण्याचा स्प्रे

साबण आणि पाण्याना एक सोपा उपाय झुरळांना मारण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो. झुरळांवर त्याची थेट फवारणी करा. त्या द्रावणातील साबण त्यांच्या शरीराला चिकटून राहतो आणि त्यामुळे
त्यांच्या श्वासोच्छवासाची छिद्रे बंद होतात, ज्यामुळे त्यांना जीव वाचवणे कठीण होते.

लिंबाचा रस

लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असते, जे झुरळांसाठी त्रासदायक ठरू शकते. लिंबाचा रस आणि पाण्याचे मिश्रण एक नैसर्गिक आर्द्रतादेखील निर्माण करतात.

फॅब्रिक सॉफ्टनर स्प्रे

फॅनिक सॉफ्टनरमध्ये अशी काही रसायने असतात, जी झुरळांच्या श्वासोच्छ्वासाच्या छिद्रांना बंद करू शकतात, ज्यामुळे त्यांना गुदमरण्याचा धोका असतो. फॅब्रिक सॉफ्टनर पाण्यात मिसळून, ते झुरळांवर फवारा. झुरळे या फवाऱ्याच्या संपर्कात येताच मृत्युमुखी पडतात.

पेट्रोलियम जेली ट्रॅप

एका बरणीला पेट्रोलियम जेली लावा आणि त्यात बेड किंवा फळासारखे आमिष ठेवा. झुरळे आत जातात; पण चिकट पृष्ठभागामुळे पुन्हा बाहेर पडू शकत नाहीत.