How to Clean Your Phone Case: हल्ली प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड फोन पाहायला मिळतो. हाच फोन बाहेरून अधिक आकर्षक दिसावा आणि सुरक्षित राहावा यासाठी लोक विविध पद्धतीचे कव्हर लावतात. फोनच्या या कव्हरमध्येही विविध डिझाइन्स, कलर पाहायला मिळतात. पण, अनेक जण फोनला पारदर्शक कव्हर वापरतात, जे लवकर खराब होतात. पारदर्शक कव्हर कधी काळपट तर कधी पिवळे दिसू लागते. अशा परिस्थितीत कव्हर वारंवार बदलण्याऐवजी तुम्ही ते घरी सहजपणे स्वच्छ करू शकता.

पिवळे, काळे पडलेले कव्हर ‘या’ पद्धतीने स्वच्छ करा

बेकिंग सोडा आणि पाणी

तुम्ही मोबाईलचे कव्हर बेकिंग सोड्याच्या मदतीने स्वच्छ करू शकता. यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून जाडसर पेस्ट बनवा. आता ही पेस्ट कव्हरवर लावा आणि ब्रशच्या मदतीने हलक्या हाताने घासून घ्या. काही वेळ तसेच राहू द्या. आता कोमट पाण्याने कव्हर स्वच्छ करा.

लिंबू आणि मीठ

पिवळे, काळे पडलेले फोनचे कव्हर लिंबू आणि मिठाच्या मदतीने नवीन बनवता येते. कव्हरवर लिंबाचा रस आणि मीठ शिंपडा. हे मिश्रण काही वेळ हातांनी घासून घ्या. आता ते काही वेळ बाजूला ठेवा आणि नंतर पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करा.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

तुम्ही फोन कव्हर व्हिनेगर आणि बेकिंग सोड्यानेदेखील स्वच्छ करू शकता. यासाठी प्रथम एका भांड्यात व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिसळा. आता या द्रावणात कव्हर ३० मिनिटे भिजवून ठेवा. त्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित स्वच्छ करू शकता आणि पाण्याने धुवू शकता.