फॅशन विश्व हे फारच अजब. इथे कोणताही ट्रेण्ड स्थिर नसतो. जे जगावेगळं असेल त्याचा बोलबाला या विश्वात अधिक. ट्रेंडच्या बाबतीत अस्थिर पण तितक्यात ग्लॅमरस अशा या फॅशनविश्वात सध्या जेलो म्हणजेच अमेरिकन सिंगर, अभिनेत्री जेनिफर लोपेझच्या फॅशनची सर्वाधिक चर्चा होताना दिसत आहे.
जेलोनं परिधान केलेल्या जगप्रसिद्ध ब्रँड वर्साचीच्या डेनिम बुटानं सगळ्यांना आकर्षित केलं आहे. पांढरा शर्ट आणि त्यावर फिकट रंगाच्या डेनिमचे शूज अशा जेलोच्या हटके लूकचे फोटो वर्साचीनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले. हे फोटो पाहून फार पूर्वी कंबरेवरून खालपर्यंत घसरत येणाऱ्या जीन्सच्या ट्रेंडची आठवण अनेकांना आली. किंबहुना जेलोनं घरंगळत खाली येणारी जीन्स नाही तर शूज घातेल आहेत हेही प्रथमदर्शी अनेकांना लक्षात आले नाही.
#JenniferLopez wearing a pair of denim boots from the #VersaceResort19 collection. #VersaceCelebrities https://t.co/3RxPsl4NwR pic.twitter.com/LEnbqb7Mwy
— VERSACE (@Versace) July 31, 2018
त्यामुळे लांबून हुबेहुब जिन्स पँटसारख्या दिसणार्या या डेनिम बुटांचा हटके लूक अनेकांना आवडला सध्या जेलोच नाही तर अनेक सेलिब्रिटींमध्ये या डेनिम बुटांचा ट्रेंड रुजू होताना दिसत आहे.