Kitchen Jugaad Video: घरातील उंदरांपासून सुटका मिळवणे अनेकांसाठी सततची लढाई आहे. किचनवर, सोफ्याखाली, बेडखाली, कपाटाखाली कुठेही बघा, उंदीर आपली उपस्थिती दाखवतच असतात. घरातून एका उंदराला काढलंत, दुसऱ्या दिवशी दुसरा उंदीर दिसतो, कुठून येतो माहीत नाही; पण त्यांची संख्या कमी होत नाही. अशा परिस्थितीत सोशल मीडियावरील एक व्हायरल व्हिडीओ सगळ्यांनाच थक्क करून टाकतोय. यामध्ये एका महिलेने असा जुगाड दाखवला की, नक्कीच तुम्ही कधी विचारही केला नसेल.

महिलेच्या व्हिडीओनुसार, उंदरांना आकर्षित करणं आणि त्यांना घराबाहेर नेणं एकाच वेळेस करता येऊ शकतं.
यासाठी लागते:

  • एक चमचा चण्याची डाळ
  • कोणत्याही एक्स्पायर झालेल्या औषधाच्या एका गोळीची पूड
  • देशी तूप
  • बेकिंग सोडा
  • गव्हाचं पीठ
  • थोडं पाणी

सर्व घटक एकत्र करून मिश्रण तयार केलं जातं. या मिश्रणात तूप आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे उंदरांना आकर्षित केलं जातं, तर औषधाची पूड आणि बेकिंग सोड्यामुळे त्यांना अस्वस्थता वाटते. नंतर हे मिश्रण प्लास्टिकचा कंगवा, प्लास्टिकचे झाकण, कापूस किंवा पेपर घेऊन त्यावर लावलं जातं. जेथे उंदीर आढळतात, तिथे हे मिश्रण ठेवायचं किचन, सोफ्याखाली, बेडखाली, कपाटाखाली, दरवाज्याच्या मागे.

आणि इथेच सस्पेन्स! कंगवा का? हो, कंगव्याचा उपयोग फक्त केस विंचरण्यासाठी नाही; या जुगाडात कंगव्यावरही मिश्रण लावलं जातं आणि मुख्य दरवाजाच्या खाली ठेवले जाते, जिथून उंदीर सहज प्रवेश करू शकतात.

व्हिडीओमध्ये महिला सांगते की, या मिश्रणाचा थोडासा भाग उंदरांच्या पोटात गेल्यानेही प्रभाव दिसतो, त्यांना अस्वस्थ वाटतं आणि ते घराबाहेर पळतात. तुम्ही विचार करत असाल की, “कंगवा दारात ठेवून काय होणार?” तर कंगवा दारात ठेवणे म्हणजे उंदरांच्या प्रवेशाची सर्वात संभाव्य जागा बंद करणे. मिश्रणामुळे उंदरांना अस्वस्थता निर्माण होते आणि कंगवा दरवाज्याखाली असल्यामुळे, उंदीर घरात प्रवेश करू शकत नाहीत.

जर तुम्ही कंगवा दारात ठेवला आणि त्यावर मिश्रण लावलं, तर उंदीर घरात येणार नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा जुगाड, घरातून उंदरांपासून सुटका मिळवण्याचा अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग ठरतोय.

येथे पाहा व्हिडीओ

Avika Rawat Foods या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करून पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का ते आम्हाला कमेंट करून कळवा.

(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)