Kidney Damage Symptoms: किडनीचं काम म्हणजे रक्त शुद्ध करणं, शरीरातून टॉक्सिन आणि जास्त पाणी बाहेर टाकणं आणि हार्मोनचं संतुलन राखणं. जेव्हा किडनी हे सगळं नीट करू शकत नाही, तेव्हा त्याला किडनी फेल्युअर म्हणतात. किडनीची खराबी एकदम होत नाही, ती हळूहळू अनेक वर्षांनी होते. चुकीचा आहार, वाईट जीवनशैली आणि काही आजार यासाठी कारणीभूत असतात. चुकीच्या आहार आणि जीवनशैलीचा अर्थ म्हणजे तळलेलं, मसालेदार खाणं, जास्त मीठ, जास्त प्रोटीन असलेला आहार, धूम्रपान, दारू आणि झोपेची कमतरता – हे सगळं किडनीवर सायलेंट किलरप्रमाणे परिणाम करतं.
मेडिकल कारणांमध्ये अनकंट्रोल्ड हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, खूप दिवस पेनकिलर घेणं, अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधं घेणं, यामुळे किडनीवर ताण येतो आणि नुकसान होऊ शकतं. युरिन इन्फेक्शन, किडनी स्टोन, पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनमुळेही किडनीवर ताण पडतो.
फोर्टिस हॉस्पिटल, नोएडा येथील नेफ्रोलॉजी विभागाच्या डायरेक्टर डॉ. अनुजा पोरवाल यांनी सांगितलं की, किडनी फेल होण्याचं सगळ्यात मोठं कारण हाय बीपी आणि डायबिटीस आहे. या आजारांवर वेळेत उपचार केले आणि त्यांना नियंत्रणात ठेवलं तर किडनी वाचवता येते. किडनी खराब झाल्यावर शरीरात टॉक्सिन जमा होऊ लागतात आणि शरीर आजारांचं घर बनतं. चला तर मग जाणून घेऊया की किडनी खराब झाल्यावर शरीरात कोणकोणती लक्षणं दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष अजिबात करू नये.
वारंवार लघवी होणं किंवा लघवी कमी होणं (Kidney Failure Symptoms)
जर तुम्हाला वारंवार लघवी होतेय, विशेषतः रात्री किंवा लघवीची मात्रा नेहमीपेक्षा कमी होत असेल तर हे किडनीच्या समस्येचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. लघवी फेसाळ, गडद रंगाची किंवा रक्तासह येत असेल तर ते किडनी डॅमेजकडे इशारा करतं.
सतत थकवा किंवा अशक्तपणा (Kidney Damage Signs)
किडनीचं एक काम म्हणजे एरिथ्रोपोइटिन नावाचं हार्मोन तयार करणं, जे शरीरात लाल रक्तपेशी (RBCs) तयार होण्यासाठी मदत करतं. जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा RBCs कमी तयार होतात आणि अॅनिमिया होऊ शकतो. त्यामुळे शरीरात थकवा, कमजोरी आणि ऊर्जा कमी जाणवते, पण लोक याकडे साधा थकवा समजून दुर्लक्ष करतात.
घोटा किंवा हाता-पायात सूज (Kidney Health Signs)
किडनी शरीरात पाणी आणि सोडियमचं संतुलन राखते. जेव्हा किडनीला नुकसान होतं तेव्हा जास्त पाणी आणि मीठ शरीरात साचायला लागतं. याचा परिणाम टाच, पाय, हात आणि चेहऱ्यावर सूज येण्यात दिसतो. जर ही सूज सतत राहिली तर तिला हलकं समजू नका.
पाठीच्या किंवा कंबरेच्या भागात वेदना (Kidney Health Symptoms)
लोअर बॅक, कंबरेच्या बाजूला किंवा किडनीजवळ वेदना होणं हेही किडनी डॅमेजचं लक्षण असू शकतं. हा त्रास किडनी स्टोन, इन्फेक्शन किंवा सूज यामुळेही होऊ शकतो. जर ही वेदना सतत राहिली आणि त्यासोबत लघवीत बदल दिसला तर लगेच डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.
मळमळ आणि भूक कमी लागणे
किडनी खराब झाल्यामुळे रक्तात टॉक्सिन जमा होऊ लागतात. हे विषारी पदार्थ शरीरात जाऊन उलटी, मळमळ आणि भूक कमी होणं अशा समस्या वाढवू शकतात. जर तुम्हाला ही लक्षणं बराच काळ जाणवत असतील तर लगेच सावध व्हा, कारण हे किडनीच्या आरोग्याशी संबंधित संकेत असू शकतात.
खाज सुटणे किंवा कोरडी त्वचा
किडनीच्या समस्येमुळे शरीरातील मिनरल्स आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडू शकते, ज्याचा परिणाम त्वचेवर होतो. पोषक तत्वांची कमतरता असल्यास त्वचेमध्ये खाज सुटते आणि त्वचा कोरडी होऊ लागते. हे तेव्हा घडते, जेव्हा किडनी रक्तातून विषारी पदार्थ नीट फिल्टर करू शकत नाही. ही लक्षणे सुरुवातीच्या किडनी डिस्फंक्शनकडे इशारा करतात आणि त्याकडे दुर्लक्ष करू नये.