Kidney, Liver Heart Problem Symptoms at Night: एका निरोगी आणि सक्रिय आयुष्यासाठी शरीरातील आणि बाहेरील अवयव नीट काम करणे खूप महत्त्वाचे आहे. बाहेरील अवयव म्हणजे हात-पाय, डोळे, नाक आणि कान. हे अवयव आपल्याला रोजच्या कामात, संतुलन ठेवण्यात, गोष्टी जाणवण्यात आणि बोलण्यात मदत करतात. शरीरातील अवयव म्हणजे हृदय, किडनी, फुफ्फुसे, लिव्हर आणि पोट. हे अवयव शरीरातील चयापचय, रक्ताचा प्रवाह, ऑक्सिजनचा पुरवठा आणि शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर काढणे यांसारखी महत्त्वाची कामे करतात.

हृदय रक्ताचा प्रवाह चालू ठेवते. मूत्रपिंड शरीरातील घाण आणि जास्त पाणी बाहेर काढते, तर यकृत शरीरातील विषारी पदार्थ साफ करते आणि पचनास मदत करते. फुप्फुसे शरीरात ऑक्सिजन पोहोचवतात आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर सोडतात. जेव्हा हे सर्व अवयव नीट काम करतात, तेव्हा आपले शरीर ऊर्जा भरलेले, मजबूत आणि रोगप्रतिकारक शक्ती असलेले राहते. याशिवाय नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी केल्याने या अवयवांची स्थिती चांगली राहते.

हेल्थलाइननुसार, शरीरातील महत्त्वाचे अवयव हृदय, किडनी आणि यकृत. काही समस्या असल्यास शरीर आपल्याला काही संकेत देते. या अवयवांमध्ये त्रास होत असेल तर शरीर रात्री काही इशारे देते. रात्री झोपेत असताना होणाऱ्या काही समस्या, जसे की छातीत दुखणे, खाज, श्वास घेण्यात अडचण, अचानक घाम येणे किंवा वारंवार बाथरूमला जाणे हे हलकेच त्रास नाहीत, तर मोठ्या समस्येचे लक्षण असू शकतात.

संशोधनानुसार, रात्री वारंवार दिसणारी ही लक्षणे मोठ्या आजारांचे, विशेषत: हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारांचे, चेतावणी संकेत असू शकतात. कोणत्याही आजारात रात्री सर्वात जास्त त्रास होतो, कारण या वेळी शरीराची कामे मंदावलेली असतात, हार्मोन्स बदलतात आणि शारीरिक व मानसिक ताण अधिक जाणवतो.

हे संकेत ओळखणे खूप महत्त्वाचे आहे, कारण लवकर वैद्यकीय तपासणीने समस्या लक्षात येऊ शकते आणि योग्य वेळेत उपचार केल्यास गंभीर गुंतागूंत टाळता येते. चला तर मग पाहूया, हृदय, किडनी आणि लिव्हरमध्ये त्रास असेल तर रात्री शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात.

रात्रीच्या वेळी हृदयरोगाची लक्षणे

  • रात्री घाम येणे आणि छातीत त्रास
  • रात्री वारंवार घाम येणे, विशेषतः छातीत जडपणा किंवा दुखणे
  • छातीत दुखताना जडपणा जाणवणे, दाब किंवा जळजळसारखे अनुभव, हात दुखणे किंवा जबड्यापर्यंत पसरणे ही लक्षणे
  • श्वास घेण्यात अडचण
  • रात्री श्वास फुलणे, अचानक श्वास थांबणे, हे हृदयाच्या अयशस्वी होण्याचे संकेत असू शकतात. ही लक्षणं बहुधा झोपेत श्वास थांबल्यामुळे दिसतात.
  • रात्री धडधड किंवा हृदयाची अनियमितता
  • अचानक हृदयाची जोरात धडधड होणे हृदयाशी संबंधित समस्यांचे संकेत असू शकते.

लिव्हरच्या आजाराची रात्रीची लक्षणे

  • रात्री सतत खाज सुटणे हे लिव्हरची समस्या दर्शवू शकते. खरंतर, लिव्हर नीट काम करत नसेल तर बाइल सॉल्ट जमा होतो आणि त्यामुळे त्वचेत खाज येते. ही खाज रात्री वाढते आणि झोपेत त्रास होऊ शकतो.
  • रात्री पायात गोळा येणे आणि स्नायू ताठरणे
  • दीर्घ काळ लिव्हरची समस्या असल्यास इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात, ज्यामुळे रात्री पायात गोळे येऊ शकतात.
  • झोपेत अडचण होणे हेदेखील लिव्हरच्या समस्येचं लक्षण असू शकते. लिव्हर खराब झाल्यावर शरीरात विषारी पदार्थ वाढतात, ज्यामुळे झोप प्रभावित होते.

किडनीसंबंधित आजाराची रात्री दिसणारी लक्षणे

  • रात्री वारंवार लघवी होणे
  • रात्री पायात वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे
  • रात्री सूज वाढणे हे किडनी फेल होण्याची लक्षणे असू शकतात. किडनीने नीट काम न केल्यास शरीरात जास्त पाणी जमा होते, ज्यामुळे पाय, टाच किंवा पायात सूज येऊ शकते. रात्री ही समस्या जास्त जाणवते.