Kids Thumb Sucking: लहान बाळांची अंगठा चोखण्याची सवय ही अगदी सामान्य आहे. काही अल्ट्रासाऊंडमध्ये बाळ आईच्या पोटातही अंगठा चोखत असते असे दिसून आले आहे. त्यामुळे बहुतांश बाळं आपल्याला जन्मनंतर अंगठा चोखताना दिसतात. मात्र बाळाच वय वाढूनही ही सवय जेव्हा सुटत नाही तेव्हा चिंतेचा विषय बनते. साधारणपणे दोन ते चार वर्षे वयोगटातील लहान मुलं अंगठा चोखतात. यामागे अनेक कारणं आहेत. आई-वडील काही ना काही युक्त्या वापरून अंगठ्यावर काहीतरी ठेवून ही सवय सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण लहान मुल आणखी सावध होत गुपचूप अंगठा चोखायला लागते, यामुळे आपण सर्वप्रथम लहान मूल अंगठा का चोखते जाणून घेऊ.

लहान मूल अंगठा चोखण्यामागची कारण काय आहेत?

१) लहान मूल अंगठा चोखण्यामागे अनेक कारणे असू शकतात.

२) जेव्हा दोन वर्षांपर्यंतची मुलं अंगठा चोखतात तेव्हा त्यांना कधीकधी आराम वाटतो. यावेळी दात पडत असल्याने त्यांना वेदना होत असतात. त्यामुळे अंगठा चोखल्याने बाळाला आराम मिळतो.

३) काही लहान मुलं अंगठा चोखून झोपण्याचा प्रयत्न करतात, पण हळूहळू ही त्यांची सवय बनून जाते.

४) काही लहान मुलांमध्ये अंगठा चोखण्याची मानसिक कारणे देखील असतात जी पालकांनी समजून घेणे गरजेची आहेत, अन्यथा ही सवय सुटणार नाही.

अंगठा चोखल्याने बाळाचे होणारे नुकसान

१) सतत अंगठा चोखल्याने मुलाचे दात आतील बाजूस जाऊ लागतात, जे नंतर खूप वाईट दिसतात.

२) काही अभ्यासांमध्ये आढळले की, सतत अंगठ्या चोखल्याने अंगठ्याची हाडे वाढतात.

३) मुलं तोतल बोलण्याचे प्रमाण वाढते.

४) नखांमधील बॅक्टेरिया पोटात जाऊन मुलाला इंफेक्शन होऊ शकते.

५) अंगठ्या चोखल्याने त्यावरील त्वचेचे नुकसान होते. यामुळे लहान मुलांमधील अंगठा चोखण्याची सवय लवकरात लवकर सोडवली पाहिजे.

अंगठा चोखण्याची सवय कशी सोडवायची?

१) मुलाला अंगठा चोखण्याच्या सवयीपासून सोडवायचे असल्यास शारीरिक युक्त्यांपेक्षा सायकोलॉजिकल युक्त्या चांगल्या काम करतात.

२) जर मुलं सतत अंगठा चोखत असेल तर त्याकडे लक्ष देऊन त्याला असे नको करु असे प्रेमाने समजवा.

३) जेव्हा तुमचे मुलं अंगठा चोखत नाही तेव्हा त्याची स्तुती करा, काहीतरी बक्षीस द्या.

४) मुलाला एक टार्गेट द्या, जर त्याने झोपेत अंगठा चोखला नाही तर त्याला आवडीचे काहीतरी मिळेल.

५) या गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हा स्टिकर्स वापरू शकता.

६) जेव्हा मुलं अंगठा न चोखता झोपते तेव्हा त्याला स्टिकर्सच्या मदतीने दाखवा आणि त्याची स्तुती करा.

७) जर मुलं ७-८ वर्षांचे होऊनही अंगठा चोखत असेल तर त्याला नक्की डॉक्टरांकडे दाखवा.