3 Easy way to remove cylinder stain on tiles : बहुतेक घरांमध्ये स्वयंपाक करण्यासाठी एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर करतात. जड लोखंडाचा हा सिलिंडर ठेवण्यासाठी स्वयंपाक घरात एक विशिष्ट जागा असते. पण रोज त्याच ठिकाणी सिलिंडर ठेवल्याने फरशीवर गंजाचे डाय तयार होतात. यामुळे फरशी अस्वच्छ दिसू लागते. मात्र हे डाग साफ करणे फार अवघड काम असते. कारण फरशी कितीही पुसली तरी हे डाग सहज निघत नाहीत. यात पांढऱ्या फरशीवर हे डाग उठून दिसतात. यामुळे आम्ही तुम्हाला काही प्रभावी टिप्स सांगणर आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही फरशीवरील सिलिंडरचे गंजाचे डाग सहज काढू शकता .

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिलिंडरमुळे फरशीवर पडलेले गंजाचे डाग साफ करण्यासाठी सोप्या टिप्स

१) लिंबू आणि बेकिंग सोडा

सिलिंडरमुळे फरशीवर तयार झालेले गंजाचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाचा वापर करा. यासाठी एका भांड्यात एक कप पाणी, एक चमचा बेकिंग सोडा आणि एका लिंबाचा रस घ्या. आता हे मिश्रण फरशी किंवा टाइल्सवर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्या. यानंतर स्क्रबरच्या मदतीने घासा. काही वेळाने फरशी पूर्णपणे स्वच्छ होईल.

२) मीठ आणि व्हिनेगर

मीठ आणि व्हिनेगरच्या मदतीने तुम्ही फरशीवरील सिलिंडरचे हट्टी डाग सहज काढू शकता. यासाठी एका कपमध्ये अर्धा कप व्हिनेगर घ्या आणि त्यात एक चमचा मीठ घाला. आता ते चांगले मिक्स करुन डाग असलेल्या फरशी लावा आणि काही वेळ राहू द्या. स्क्रबरने घासून घ्या. यामुळे सिलिंडरचे डाग गाय होतील.

हेही वाचा – Home Cleaning Tips: सिलिंग फॅन साफ करण्यासाठी आता शिडी, टेबलची गरज नाही, वापरा फक्त ‘या’ ३ ट्रिक्स

३) रॉकेल

जर तुमच्या घरात रॉकेल असेल तर तुम्ही त्याच्या मदतीनेही हे हट्टी डाग सहज साफ करू शकता. यासाठी अर्धा कप पाणी घेऊन त्यात २ ते ३ चमचे रॉकेल टाका. आता डाग असलेल्या भागावर टाका. ५ मिनिटांनंतर ही जागा कशाने तरी घासून घ्या. डाग सहज निघून जातील.

४) टूथपेस्ट

तुम्ही टूथपेस्टच्या मदतीनेही स्वयंपाकघरातील पांढर्‍या फरशीवर पडलेले डाग साफ करू शकता. यासाठी कोणतीही टूथपेस्ट घेऊन ती गंजाचे डाग असलेल्या फरशीवर लावा. त्यानंतर ब्रशच्या मदतीने घासून घ्या. नंतर पाण्याने धुवा. अशाप्रकारे फरशीवरील डाग नाहीसे होतील.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen cleaning tips cylinder marks on kitchen floor know how to remove cylinder stain on tiles in minutes follow these 4 tricks sjr