Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी सिलेंडरवर लिंबू ठेवून पाहिलं आहे का? आता तुम्ही म्हणाल लिंबू आणि सिलेंडरला कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.

जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवा किचन जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही कधी गॅस सिलेंडरला लिंबू लावून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.. आता तुम्ही म्हणाल काय सिलेंडरवर लिंबू ठेवून काय होणारे. गॅस सिलेंडरवर लिंबू लावल्यानंतर अशी कमाल झाली की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.

बहुतांश घरांमध्ये सिलिंडरचा वापर जेवण तयार करण्यासाठी होतो. बहुतांश घरात शेगडी जवळ सिलिंडर ठेवण्यात येते. हा सिलिंडर लोखंडापडून तयार केले जातात. ज्यामुळे तो वजनाला फार जड असतात. स्वयंपाकघरात सिलिंडर जिथे ठेवला जाते, त्या ठिकाणी घाणेरडे गंजाचे डाग तयार होतात.डाग कुठेच चांगले दिसत नाहीत. कपड्यावर असो अथवा किचनच्या टाईल्सवर. दिसायला हे खूपच घाण दिसते. पण त्यातही किचनमधील सिलिंडरचे डाग लादीवर उमटले तर लादीची चमक अधिक खराब होते. किचनच्या लादीचा रंग पांढरा असेल तर यावर हे डाग अधिक उठून दिसतात. तसंच सिलिंडर ज्या भागात ठेवला जातो तिथेही डाग उमटलेले दिसतात. मग अशा वेळी जर स्वच्छता करायची असेल आणि सिलिंडरचे डाग घालवायचे असतील तर मात्र खूप विचार करावा लागतो. पण आता तुम्हाला डोकं खाजवावं लागणार नाही तर किचनमधील सिलिंडरचे डाग घालविण्यासाठी तुम्ही सोप्या हॅक्सचा वापर करा.

दरम्यान, गृहिणींसाठी आम्ही एक जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला सिलिंडरवर किंवा खाली लिंबू घासायचा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, सिलिंडरवर लिंबू कशाला? तर हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील मोठ्या समस्येवर मात करणार आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. तुम्ही सिलिंडरखाली फरशीवर पडलेले डाग अगदी काही सेकंदामध्ये घालवू शकता, लिंबूमध्ये असणारे अॅसिड हे डाग सहज घालवू शकते.

पाहा व्हिडीओ

@Puneri tadka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.

(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)