Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गृहिणींनो तुम्ही कधी सिलेंडरला बटाटा लावून पाहिला आहे का? आता तुम्ही म्हणाल बटाटा आणि सिलेंडरला कशाला ? मात्र थांबा याचा मोठा फायदा आहे. तुम्हाला हा उपाय जितका विचित्र वाटतो आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त तो फायद्याचा आहे.
जेवण बनवताना फक्त एखादा चविष्ट पदार्थ बनवणे हे टास्क नसते तर त्याबरोबर अनेक लहान-मोठी आव्हानं असतात. ही आव्हानं रोज पुर्ण करत महिला जेवण दररोज जेवण बनवतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक नवा किचन जुगाड घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्ही कधी गॅस सिलेंडरला बटाटा लावून पाहिला आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे.. आता तुम्ही म्हणाल काय गॅसला बटाटे टाकून काय होणारे. गॅस सिलेंडरला बटाटा लावल्यानंतर अशी कमाल झाली की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.
तुम्हाला करायचं काय आहे तर बटाटा घ्यायचा आहे आणि तो कापायचा आहे. आता हा कापलेला बटाटा तुम्हाला सिलेंडरच्या तळाला घासायचा आहे. याचा फायदा काय तर… तुम्ही पाहिलं असेल की सिलेंडरच्या तळाशी गंज पकडतो. त्याचे डाग फरशीला लागतात आणि सहसा ते जात नाहीत. पण सिलेंडरखाली असा बटाटा चोळल्याने गंज पकडणार नाही आणि ते फरशीला लागणार नाही.
पाहा व्हिडीओ
Aysha’s Kitchen Hacks युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा
(सूचना – या लेखातील माहिती सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता संकेतस्थळाचा याच्याशी काहीही संबंध नाही. लोकसत्ता संकेतस्थळ याची हमी देत नाही.)
© IE Online Media Services (P) Ltd