Kitchen jugad video: साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसरा. दसरा अर्थात विजयादशमी म्हणजे विजयाचा उत्सव. केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणात झेंडूच्या फुलांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी विशेषतः झेंडूच्या फुलांचा वापर पूजेसाठी केला जातो. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचाच वापर होतो. दसरा संपला की हे एक तर आपण निर्माल्यात टाकतो किंवा कचऱ्यात फेकून देतो. तुम्हीही तेच करता का? दसऱ्यासाठी असो वा कधीही पूजेसाठी वापरलेली असो ही फुलं किंवा पाने बिलकुल फेकू नका. त्याचा मोठा फायदा आहे. या किचन जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मग महिलेनं सांगितलेला हा भन्नाट जुगाड एकदा नक्की करुन पाहा.वापरलेल्या फुलांचा काय उपयोग असणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही याचा फक्त एक नाही तर अनेक फायदे आहेत. एका महिलेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत याचे सगळे फायदे सांगितले आहेत. याचा वापर कसा करायचा ते सांगितलं आहे.
पहिला उपयोग – सर्वात आधी एक भांडं घ्या त्यात पाणी घ्या. त्यात फुलं कुस्करून टाका. यात कापूर टाका. गॅसवर ठेवून उकळून घ्या. या पाण्याचा सुगंध येईल. हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. याचा सुगंध येतं, रूम फ्रेशनरचं काम होतं. डास, माशांना दूर करतं. एकदा ठेवला तर १५ ते २० दिवस वापरू शकतो.
दुसरा उपयोग – कढई किंवा पॅन घ्या. त्यात फुलं कुस्करून घ्या. यात फुलं जास्तच घ्या कारण नंतर ती कमी होतात. गॅसवर ठेवून परतून घ्या. या पाकळ्या तुम्हाला गरम करून वाळवून घ्या. ती कुरकुरीत होती आता हातांनी कुस्करून किंवा मिक्सरमध्ये टाकून पावडर करून घ्या. ती चाळून घ्या. चाळून घेतलेल्या फुलांच्या पावडरमध्ये कापराची पूड टाका. यात तूप किंवा तेल टाका आणि मिश्रण मिक्स करून घ्या. तयार असलेली ओली धूपकांडी घ्या म्हणजे ती बांधायला चांगली मिळते. होमहवनची सामग्री असल्यास तेसुद्धा यात टाकू शकता. अगरबत्तीही तोडून टाकू शकता. ही तुमची धूपस्टीक तयार झाली.
पाहा व्हिडीओ
puneri tadaka यूट्यूब अकाउंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा.