श्रीकृष्ण म्हटलं की त्यांच्या बाललीला, प्रेम, मित्रत्व, त्याग, राजकारण, महाभारत, भगवद्गीता, तत्वज्ञान या सर्व गोष्टींचे स्मरण होते. तर विविध ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जयंती, श्री जयंती, अष्टमी रोहिणी अश्या विविध नावांनी संबोधले जाते. श्रीकृष्णाच्या चैतन्यरूपामुळे गोकुळात कायम प्रेम आणि स्नेहाचे वातावरण असे. तर अशा श्री कृष्णाची रास काय आहे? आणि महाभारतामधील युद्ध काळात त्याचे वय किती होते? जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीकृष्णाची रास कोणती?

जन्माष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्माचा दिवस म्हणून संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. सुमारे पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्रीविष्णूंनी आठवा अवतार कृष्णावतार धारण केला होता. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची ही प्रथा आहे. त्यावेळी चंद्र वृषभ राशीत विराजमान होते. एकंदरीत या ग्रहमानामुळे श्रीकृष्णांची रास वृषभ असल्याचे सांगितले जाते. तसेच गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा केली जाते.

महाभारतच्या वेळी श्री कृष्णाचे वय किती होते?

श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करताना त्याच्या लीला, शिकवण, धोरणे, मुसद्देगिरी, नीतिमत्ता या सर्वांची आठवण काढली जाते. भगवान श्रीकृष्णांनी जीवनातील प्रत्येक संकटावर युक्तीने, बुद्धिचातुर्याने आणि वेळेप्रसंगी अन्य व्यक्तींच्या सहकार्याने कशी मात करावी, ते शिकविले. महाभारतातील महानायक म्हणून श्रीकृष्णाकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका श्रीकृष्णांनी महाभारत युद्धावेळी अगदी चोख बजावल्या. महाभारतातील युद्धाच्यावेळी श्रीकृष्ण यांचे वय ८९ वर्ष होते, असे सांगितले जाते. महाभारत युद्धाच्यातब्बल ३६ वर्षांनंतर म्हणजेच वयाच्या १२५ व्या वर्षी श्रीकृष्णांनी अवतार कार्याची सांगता केली.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know lord sri krishna zodiac sign and age at time of mahabharata scsm