Kojagiri Purnima 2025 Wishes :हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. त्यापैकी अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. धार्मिक तसेच आरोग्याच्या दृष्टीनेही हा दिवस अतिशय मंगल मानला जातो. मान्यतेनुसार या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये प्रकट होतो आणि पृथ्वीच्या अगदी जवळ येतो. त्यामुळे या प्रकाशकिरणांचा संपूर्ण जीवसृष्टीला लाभ होतो असे मानले जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. चांदण्यांच्या प्रकाशात ठेवलेले दूध प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची परंपरा आहे.

यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी?

तिथी प्रारंभ : ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११:२४
तिथी समाप्ती : ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:३५

६ ऑक्टोबर रोजी रात्री देवी लक्ष्मी व चंद्राची पूजा केली जाईल.

शुभ मुहूर्त : रात्री ११:४५ ते १२:३४ या वेळेत पूजन करणे उत्तम मानले गेले आहे.

या वेळी तुपाचा दिवा लावून आणि चांदण्यात ठेवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवून त्याचे सेवन केले जाते.


कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा (Kojagiri Purnima Wishes in Marathi)

१) दूध केशरी,
चंद्रांचे चांदणं,
कोजागिरीचे रूप आगळे…
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा २०२५ च्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

२) मंद प्रकाश चंद्राचा,
त्यात गोडवा दुधाचा…
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा २०२५ च्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

३) आजचा सण सुख-समाधान व आनंदाची उधळण करणारा जावो,
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

हेही वाचा
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रत.

४) चांदण्यांत न्हालेले आकाश,
दुधाच्या गोडीत वाढला नात्यांचा विश्वास,
लक्ष्मीमातेची मिळो कृपा खास,
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा अनंतास!

कोजागिरी पौर्णिमा २०२५ च्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

५) केशर दुधाची गोड चव,
चंद्रप्रकाशाची रूपेरी लव(किरणे),
मना-मनात नांदो आनंद भरपूर,
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

६) पौर्णिमेचा चंद्र, रुपेरी प्रकाश,
कोजागिरीची रात्र देई आनंद खास,
दाराशी लक्ष्मी पाहते भक्तास,
मिळो समाधान, आनंद सर्वांस
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

कोजागिरी पौर्णिमा २०२५ च्या शुभेच्छा (फोटो सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

७) कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! तुमच्या जीवनात आनंद आणि समाधान नांदो.

८) आजच्या या रुपेरी चांदण्यांच्या प्रकाशात सुख, समृद्धी आणि शांती लाभो. कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

९) लक्ष्मीमातेच्या आशीर्वादाने तुमचे घर आनंदाने भरून जावो. शुभ कोजागिरी!

१०) कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्री तुम्हाला उत्तम आरोग्य, प्रेम आणि आनंद मिळो हीच इच्छा! कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

११) रुपेरी चांदण्यांनी तुमचं आयुष्य उजळून निघो. कोजागिरी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

या कोजागिरी पौर्णिमेला शुभचिंतन, आनंद आणि समृद्धी तुमच्या जीवनात नांदो.