Malaika Arora Morning Drink: आरशात पाहिल्यावर मलायका अरोराचा तजेलदार चेहरा, बॉडी टोन आणि ताजेतवाने हास्य पाहून प्रत्येकालाच प्रश्न पडतो, ती अशी कशी दिसते रोज सकाळी? आता या रहस्यावर पडदा उचलला आहे अमेरिकन गट हेल्थ एक्स्पर्ट डॉ. पलनीअप्पन मणिकम (Dr. Pal) यांनी. त्यांनी सांगितलंय की, मलायका सकाळच्या सुरुवातीला घेत असलेला एक छोटासा उपाय शरीराला आतून शुद्ध करतो, पचन सुधारतो, चरबी कमी करतो आणि मन शांत ठेवतो. पण हे उपाय काय आहे, ते जाणून घेण्याआधी पाहूया याचे पाच मोठे फायदे काय आहेत, ज्यामुळे डॉक्टरदेखील म्हणतात, “हे पेय रोज सकाळी घ्या, औषधांची गरज भासणार नाही.”
मलायका अरोराच्या या ‘एक’ पेयामागे दडलंय रहस्य
१. नैसर्गिक पचन सुधारक
डॉ. पल सांगतात, “भारतीय घरातले दोन ‘किचन डॉक्टर’ म्हणजे जिरं आणि ओवा.” जिऱ्यामध्ये असणारं थायमॉल नावाचं एन्झाइम पचनरसांची निर्मिती वाढवतं, अन्न पचायला मदत करतं. ओवा पोटातील गॅस, फुगेलपणा आणि जडपणा कमी करतो. रात्री झोपून उठल्यावर शरीराचं पचनसंस्थान मंद असतं. हे पेय ते हळूवारपणे जागं करतं आणि दिवसाची सुरुवात सहज बनवते कॅफिनशिवाय ऊर्जायुक्त पद्धतीने.
२. चरबी कमी करण्यासाठी हळूहळू पण खात्रीशीर उपाय
डॉ. पल यांच्या मते, “जिरं हे वजन कमी करण्यासाठी सिद्ध घटक आहे.” एका संशोधनानुसार जिरं घेतल्याने शरीरातील चरबीचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं. त्यात ओवा मिसळल्याने शरीरातील पाणीधारणा कमी होते आणि पोषक तत्त्वांचं शोषण सुधारतं. हे पेय वजन अचानक कमी करत नाही, पण नैसर्गिक पद्धतीने मेटाबॉलिझमला चालना देतं.
३. शरीराची शांत डिटॉक्स प्रक्रिया – लिव्हरसुद्धा खूश
रात्री जिरं आणि ओवा भिजवून ठेवल्यावर त्याच्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि तेलकट घटक पाण्यात मिसळतात. सकाळी हे पाणी प्यायल्याने आतड्यातील घाण बाहेर पडते, आम्लपित्त कमी होते आणि लिव्हरचं कार्य सुरळीत चालतं. डॉ. पल म्हणतात, “मी स्वतः या पेयात थोडी बडीशेप घालतो, त्यामुळे शरीराची शुद्धी आणि डिटॉक्स अधिक प्रभावी होतो.”
४. ब्लड शुगर नियंत्रण – ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत
फक्त पचन नाही, तर रक्तातील साखरेवरही या पेयाचा प्रभाव दिसतो. जिरं आणि बडीशेप दोन्ही घटकांनी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि जेवणानंतर साखर अचानक वाढू नये यावर नियंत्रण मिळतं. दिवसभर ऊर्जावान राहण्यासाठी ही एक नैसर्गिक औषधी सकाळची सुरुवात ठरते.
५. मनशांती आणि मानसिक संतुलन
गरम, सुगंधी आणि नैसर्गिक पेयाचा पहिला घोट घेताच शरीर शांत होतं. मलायका म्हणते, “हे माझं ‘मॉर्निंग मेडिटेशन’ आहे. पहिला घोट म्हणजे दिवसाचं शांततेचं औषध.” डॉ. पल यांच्या शब्दांत, “परंपरागत उपाय फक्त शरीराला नाही, तर मनालाही उपचार देतात. आरोग्याचं खरं रहस्य म्हणजे संतुलन, परिपूर्णता नव्हे.”
मग अखेर मलायका अरोरा दररोज सकाळी नेमकं काय पिते, ज्याचा इतका चमत्कारिक प्रभाव आहे, ते काही महागडं हेल्थ ड्रिंक नाही.
ती पिते “जिरे-ओवा पाणी.”
रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा भिजवून ठेवायचा.
सकाळी हे पाणी गाळून कोमट अवस्थेत प्यायचं.
डॉ. पल म्हणतात, “हे पेय साधं असलं तरी प्रभावी आहे. रोज पिणाऱ्याला शरीरात फरक जाणवतो. पचन सुधारतं, ऊर्जा वाढते आणि मन शांत होतं.”