Apple च्या वार्षिक डेव्हलपर्स कॉन्फरन्स WWDC 2020 ला सुरूवात झाली आहे. हा इव्हेंट 22 जूनपासून सुरू झाला असून 26 जूनपर्यंत असेल. या इव्हेंटमध्ये अ‍ॅपलने iMessage चा उल्लेख करुन व्हॉट्सअ‍ॅपचं टेन्शन वाढवलंय. अ‍ॅपलने आपल्या  iMessage अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले असून आता इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप्सना टक्कर देण्याची क्षमता यामध्ये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्रुप चॅट्स करा कस्टमाइज :-
या अ‍ॅपद्वारे दर्देजार अनुभव देण्याचा कंपनीने प्रयत्न केला असून आता युजर्सना यामध्ये ग्रुप चॅटिंगचा शानदार अनुभव मिळेल.
iOS 14 अपडेटनंतर युजर ग्रुप चॅट्सला पर्सनल फोटो किंवा इमोजीला मुख्य इमेज म्हणून सेट करुन कस्टमाइज करु शकतील. यासोबतच आता चॅटिंग दरम्यान युजर ग्रुप मेंबरचा प्रोफाइल आयकॉनला मेन ग्रुप इमेजसह बघू शकतील.

मेसेजेसमध्ये आलं Mentions फीचर :-
मेसेजेसचा चांगला अनुभव देण्यासाठी अ‍ॅपलने यामध्ये Mentions फीचर आणलं आहे. यामध्ये तुम्हाला ‘@’ चा वापर करण्याची आवश्यकता नसेल. मेसेजेस युजरला कॉन्टॅक्टचं नाव टाइप करताच सजेशन आणि सिलेक्ट करण्याचा पर्याय मिळेल. जो कॉन्टॅक्ट युजर सिलेक्ट करतील तो ब्लू कलरमध्ये हायलाइट होईल. याशिवाय युजरला नवीन अपडेटमध्ये एखाद्या चॅटमध्ये Mentionकेल्यानंतर नोटिफिकेशनही मिळेल. जेव्हा एखाद्या ग्रुपला म्यूट केलं असेल त्यावेळी हे फीचर उपयोगी पडतं.

Memoji मध्ये केला बदल :- 
तसेच, आता अ‍ॅपल युजर मेसेजेस चॅटिंगदरम्यान कन्व्हर्सेशनला पिनही करु शकतील. याद्वारे युजर ज्या कॉन्टॅक्टसोबत सर्वाधिक चॅटिंग करत असेल तो कॉन्टॅक्ट वरती ठेवता येतो. अ‍ॅपलने अपडेटमध्ये मेसेजेससाठी memojis मध्येही काही बदल केलेत. iOS 14 ला कंपनी सप्टेंबर 2020 पर्यंत लाँच करेल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many new features in apple ios 14 imessage challenge whatsapp sas