Astrology : प्रत्येक मुलीला आयुष्यात असं वाटतं की तिच्या लाइफ पार्टनरने तिच्यावर प्रेम करावं आणि तिची काळजी घ्यावी. आता कोणाला कसा नवरा मिळणार, हे त्यांच्या नशीबावर अवलंबून आहे. परंतु ज्योतिषशास्त्रात अशा काही राशींचं वर्णन केलं आहे, ज्यांच्याशी संबंधित मुले उत्तम लाइफ पार्टनर किंवा उत्तम पती सिद्ध होऊ शकतात. हे लोक आपल्या पत्नीच्या भावनांचा आदर करतात आणि नेहमी सामंजस्याने चालतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृषभ: ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ पुरुष चांगले पती असल्याचे सिद्ध करतात. कारण ते घरगुती जबाबदाऱ्या सांभाळतात आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा पाहतात. वृषभ राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे आणि ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह विलास आणि आकर्षणाचा कारक मानला जातो. त्यामुळे या राशीच्या मुलांकडे मुली लवकर आकर्षित होतात. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात आणि पत्नीसोबत अधिकाधिक वेळ घालवण्याचा ते प्रयत्न करत असतात.

कर्क : या राशीच्या मुलांचं वैवाहिक जीवन आनंदी असतं. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात आणि प्रत्येक गोष्टीत तिचं मत घेणं त्यांना आवडतं. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. आणि चंद्राच्या प्रभावाखाली, या राशीची मुले शांत स्वभावाची असतात. ते नेहमीच भांडण शांत करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या लाइफ पार्टनरला आनंदी ठेवण्यासाठी ते नेहमी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात.

आणखी वाचा : Christmas 2021: जाणून घ्या ‘मेरी’ हा शब्द कुठून आला, हॅप्पी ऐवजी ‘Merry Christmas’ का म्हणतात?

धनु: या राशीच्या पुरुषांचा स्वभाव संयमशील आणि गंभीर असतो. गुरु हा धनु राशीचा अधिपती ग्रह आहे. या राशीच्या मुलांनाही अध्यात्मात रस असतो. ते वरून कणखर दिसत असले तरी आतून तितकेच कोमल मनाचे असतात. ते त्यांचे प्रत्येक नाते प्रामाणिकपणे आणि समजूतदारपणे हाताळतात. त्यांच्यासाठी, त्यांचे प्रेम जीवन कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त महत्वाचं असतं. जोडीदाराची वाईट गोष्ट ऐकून ते लगेच नाराज होतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: शत्रूसमोर चुकूनही या दोन गोष्टीं उघड करू नका, तुम्ही संकटात येऊ शकता

मीन: या राशीची मुले खूप रोमँटिक आणि शांत स्वभावाची असतात. ते त्यांच्या बायकोला डोळ्यांच्या पापण्यावर बसवून ठेवतात. ते कधीही आपल्या पत्नीची फसवणूक करत नाही. त्यांच्यासाठी त्यांचं वैवाहिक जीवन प्रथम येतं. एकंदरीत या राशीची मुले चांगले पती सिद्ध होतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Men of these zodiac signs become the best husbands know about your own how prp