कॉफी हे पेय तसं अनेकांच्याच आवडीचं. अगदी दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या ‘कापी’पासून ते ‘स्टारबक्स’ आणि इतर मोठमोठ्या आऊटलेट्समध्ये मिळणाऱ्या कॅफे लातेपर्यंत विविध रुपांमध्ये ही कॉफी आपल्या समोर येते. दरांपासून ते चवींपर्यंत प्रत्येक गोष्टीत कॉफी तिचं वेगळेपण सिद्ध करुन गेली असं म्हणायला हरकत नाही. कोणाला भेटणं असो किंवा मग एखादी महत्त्वाची मिटींग असो, प्रत्येक वेळी कॉफीचीसुद्धा महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली आहे. अशा या सर्वांच्याच आवडत्या कॉफीची नवी चव सर्वांच्या जिभेवर तरळण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘फोर सिग्मॅटीक’ या ब्रँडने ही नवी कॉफी बाजारात आणली आहे. मशरुम हा या कॉफीतील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ‘फोर सिग्मॅटीक’च्या संस्थापकांनीच याविषयीची माहिती देत रोगप्रतिकारक शक्ती असणाऱ्या या कॉफीबद्दल काही माहिती दिली. रेशी Reishi मशरुमपासून ही कॉफी तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये असणाऱ्या तत्वांमुळे त्वचा निरोगी राहते, असंही संस्थापक टेरो आयसोकौप्पीला यांनी सांगितल्याचं वृत्त ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलं होतं.

ही मशरुम कॉफी रक्तातील साखरेचं प्रमाण आणि चयापचन क्रियेत योग्य तो समतोल राखण्यास कारणीभूत ठरतं. तेव्हा आता या कॉफीला कितपत पसंती मिळते आणि मोठमोठ्या आऊटलेट्समध्ये ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

सध्या सर्वत्र याच मशरुम कॉफीच्या चर्चा आहेत. मुळात फक्त कॉफीमध्येच नव्हे, तर चहा आणि विविध प्रकारचे शेक, ज्यूस यांच्यातही मशरुमचा सर्रास वापर केला जातो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे लॉस एन्जेलिसच्या लाईफहाऊस टॉनिक्स येथे मिळणारं श्रुम शेक. ज्यामध्ये लिंबाचा रस, चहा आणि त्यात मशरुम असं कधीही न पाहिलेलं समीकरण एकत्र केलं जातं. ही सर्व उदाहरणं पाहता प्रयोगशीलतेचं प्रमाण वाढलं असून आता खाद्य क्षेत्रावरही त्याचे पडसाद उमटल्याचं स्पष्ट होत आहे.