भारतीय वंशाच्या मुलासह अमेरिकेतील काही पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी असे नेलपॉलिश तयार केले आहे, ज्यामुळे लैंगिक हल्ला करण्यापूर्वी एखाद्या पेयात टाकलेली गुंगीची रसायने ओळखता येतात. हे विद्यार्थी नॉर्थ कॅरोलिसना स्टेट युनिव्हर्सिटीचे असून त्यांनी हे ‘नेल पॉलिश डेट रेप’ (डेटिंगच्यावेळी बलात्कार) वेळी पेयामध्ये टाकलेली रासायनिक द्रव्ये ओळखण्यासाठी तयार केले आहे. भारतीय वंशाचा अमेरिकी विद्यार्थी अंकेश मदान या विद्यार्थी चमूचा एक घटक असून या नेलपॉलिशला ‘अंडरकव्हर कलर्स’ असे नाव देण्यात आले आहे.
फेसबुक पेजवरही या नेलपॉलिशचा बराच गाजावाजा असून आमचा उद्देश हा महिलांच्या सक्षमीकरणासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे हा आहे, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीने फेसबुक पोस्टवर लिहिले आहे की, आमच्या नेलपॉलिशने महिला सक्षम होतात व स्वत:ची सुरक्षा करू शकतात. पेय दिले की, बोटाने ढवळायचे; रंग बदलला तर त्यात गुंगीचे औषध आहे असे समजावे.
‘अंडरकव्हर कलर्स’ या नेलपॉलिशचे उत्पादन करण्यासाठी या चमूला १ लाख अमेरिकी डॉलर देण्यात आले होते, त्यांना आता नॉर्थ कॅरोलिनाचा ‘उद्योजकता पुढाकार पुरस्कार’ मिळाला आहे.
हायर एज्युकेशन वर्क्सला मदान याने सांगितले की, समाजात अनेक प्रश्न आहेत त्यातील एक थोडय़ा अंशाने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मुली, महिलांना अशा डेट रेपमधून जावे लागते त्यांच्या वेदना आम्ही समजू शकतो, त्यामुळे डेट रेपवेळी पेयात मिसळली जाणारी औषधे ओळखणारे नेलपॉलिश त्यांना धोक्यापासून वेळीच सावध करू शकते.
अनेक महिला हक्क गटांनी या कल्पनेला थंडा प्रतिसाद दिला असून नेलपॉलिश तयार केले असले तरी संरक्षणाची जबाबदारी स्त्रीलाच पार पाडायची आहे असे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे मुलींच्या सुरक्षेची समस्या टाळली जाऊ शकते, अशी आम्हाला खात्री आहे, असे मत एकाने व्यक्त केले.
रंग बदलतो
पेयात गुंगीचे औषध टाकले की नाही हे समजण्यासाठी कुठल्याही महिलेने प्रथम नेलपॉलिश लावलेल्या बोटाने ते पेय ढवळावे, बोटाचे नेलपॉलिश त्यात विरघळेल व डेट रेपवेळी गुंगी येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रॉहायपनॉल झ्ॉनॅक्स किंवा जीएचबी म्हणजे गॅमा हायड्रॉक्सिब्युटिरिक अॅसिड या दोन रसायनांशी त्याची अभिक्रिया होऊन पेयाचा रंग लगेच बदलतो. त्यामुळे त्यात गुंगीचे औषध टाकले आहे समजते. एका कंपनीने या नेलपॉलिशची विक्री व विपणन सुरू केले असून ‘चॉईस मॅटर्स – द फर्स्ट फॅशन कंपनी एमपॉवरिंग विमेन टू स्टॉप सेक्शुयल अॅसॉल्ट’ अशी त्याची टॅगलाईन आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Sep 2014 रोजी प्रकाशित
गुंगी देऊन केला जाणारा अत्याचार टाळण्यासाठी नेलपॉलिश
भारतीय वंशाच्या मुलासह अमेरिकेतील काही पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी असे नेलपॉलिश तयार केले आहे, ज्यामुळे लैंगिक हल्ला करण्यापूर्वी एखाद्या पेयात टाकलेली गुंगीची रसायने ओळखता येतात.
First published on: 01-09-2014 at 02:48 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nail polish to protect women from sexual assault