कडुलिंबाच्या पानांमुळे 'या' १० समस्यांपासून मिळतो आराम , जाणून घ्या कसा करायचा वापर | Neem leaves provide relief from these 10 problems, learn how to use them | Loksatta

कडुलिंबाच्या पानांमुळे ‘या’ १० समस्यांपासून मिळतो आराम , जाणून घ्या कसा करायचा वापर

औषधी गुणधर्मांनी समृद्ध कडुलिंब शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. जाणून घ्या कोणत्या समस्येमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करावा.

कडुलिंबाच्या पानांमुळे ‘या’ १० समस्यांपासून मिळतो आराम , जाणून घ्या कसा करायचा वापर
कडुलिंब आयुर्वेदातील महत्वाची वनस्पती आहे ( फोटो : indian express)

कडुलिंब आयुर्वेदातील अत्यंत महत्वाची औषधी वनस्पती आहे. आरोग्याशी संबंधित अनेक लहान-मोठ्या समस्या कडुलिंबा पासून दूर होतात. तसंच त्वचेवर देखील कडुलिंबाचा आश्चर्यकारक प्रभाव लक्षात घेता, त्वचेच्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो. कडुनिंबामध्ये अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि टॉक्सिन काढून टाकणारे गुणधर्म असतात. तर जाणून घेऊया कडुलिंबाचे फायदे आणि वेगवेगळ्या समस्यांमध्ये कडुलिंबाचा वापर कसा करायचा.

कडुलिंबाच्या पानांचे फायदे

१. शरीरात कुठेही खाज येत असेल तर कडुलिंबाची पेस्ट लावल्याने फायदा होतो. यासाठी तुम्हाला ताजी कडुलिंबाची पाने बारीक करून खाज असलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला खाजेपासून सुटका मिळेल.

२. फक्त त्वचाच नाही तर कडुलिंब टाळूची खाज देखील दूर करते. कडुलिंबाची पाने बारीक करून डोक्याला लावल्यास त्याचे अ‍ॅटीफंगल गुणधर्म लगेचच प्रभाव दाखवतात.

३. कोंडा झाल्यास एका पातेल्यात पाणी घालून कडुलिंबाची पाने उकळा आणि पाणी हिरवे झाल्यावर गॅस बंद करा. आता कडुलिंबाचे पाणी थंड होण्यासाठी ठेवून द्या. शॅम्पू लावल्यानंतर या पाण्याने केस धुवा.

४. कडुलिंबाचा वापर अनेक प्रकारे चेहऱ्यासाठी करता येतो. कडुलिंबाची पाने बारीक करून त्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेलाही चमक येईल.

५. कडुलिंबाची पाने बारीक करून कीटक चावलेल्या ठिकाणी देखील लावता येतात. हे कीटकांद्वारे पसरणारे संक्रमण टाळेल.

६. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी कडुलिंबाची पाने बारीक करून भाजीच्या रसासोबत पिऊ शकतात.

७. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कडुलिंबाची २-३ पाने खाणे चांगले मानले जाते. ही पाने चवीला खूप कडू असतात, त्यामुळे तुम्ही ती पाण्यासोबत गिळू शकता.

८. केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येवरही कडुलिंब मदत करतो. कडुलिंबाची पावडर दररोज टाळूवर लावल्याने केस अकाली पांढरे होण्यास बंद होतात.

९. कडुलिंबाचा फेस मास्क सुरकुत्या आणि वृद्धत्व कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. कडुलिंबाची पावडर हळद किंवा बेसनासोबत लावता येते. हा फेसपॅक बनवण्यासाठी दही किंवा मधाचाही वापर केला जाऊ शकतो.

१०. हिरड्या किंवा दातांमध्ये दुखत असल्यास कडुलिंबाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते. तोंडाचा वास दूर करण्यासाठीही याचा वापर करता येतो.

(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. आवशक्यता असल्यास नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Health Tips: मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत…भिजवलेले अक्रोड खाण्याचे आहेत ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

संबंधित बातम्या

“घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत
“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव
पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली
निष्ठावंतांची काँग्रेसला गरज नाही का?

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज
आरोग्य वार्ता : कर्करोगावरील उपचारात मुली मागे
ऊस गाळपाची गती मंदावली, शेतकरी चिंतेत; लातूर जिल्ह्यातील चित्र
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात