Neha Dhupia 21 Days Health Challenge : आरोग्य चांगले राखण्यात पचनसंस्था सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी आरोग्यासाठी जंक फूड टाळून योग्य आहार घेणे पुरेसे नाही. तर, चांगल्या सवयी स्वतःला लावणेसुद्धा खूप गरजेचे आहे. तर याचबद्दल अभिनेत्री नेहा धुपिया रेसिपीजपासून ते कुटुंबासाठी पौष्टिक जेवणापर्यंत अनेक गोष्टी शेअर करीत असते; तर यावेळी अभिनेत्रीने शरीराची सूज कमी करण्यासाठी २१ दिवसांचे चॅलेंज स्वीकारले होते.
अभिनेत्रीने याचबद्दल व्हिडीओ शेअर करीत सांगितले आहे. तिचा निरोगी जीवनशैलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे सांगतो की, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी अवघड गोष्टी करण्याची गरज नाही. म्हणजेच अभिनेत्रीने शरीराची सूज कमी करण्यासाठी फक्त २१ दिवसांच्या हेल्थ चॅलेंजदरम्यान तिने सेवन केलेल्या सोप्या आणि प्रभावी पेयाबद्दल सांगितले आहे; जे शरीराची सूज कमी करण्यात मदत करू शकते.
अभिनेत्रीने सुचवलेले पेय कसे बनवायचे?
साहित्य
- हळद
- १ आलं
- ५ ते ७ काळी मिरी
- १ चमचा काळ्या जिऱ्याचे पाणी
कृती
जर तुमच्याकडे एमसीटी तेल (MCT तेल नारळ किंवा पाम कर्नेल तेलापासून बनविले जाते) नसेल तर…
- १ चमचा नारळाचे तेल
- १ चमचा तूप
- १ चमचा ऑलिव्ह तेल
- हे सगळे पदार्थ एकत्र मिक्स करा आणि हळूहळू प्या.
हे पेय शरीरासाठी कसे काम करते?
जळजळ शरीराचे नैसर्गिक संरक्षण करते; पण त्याचा अतिरेक जीवनशैलीतील आजार, थकवा आणि वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे हळद, दालचिनी यांसारखे घटक जळजळ कमी करण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी आतडे राखण्यासाठी उपयोगी ठरू शकतो, असे एका संशोधनात सांगण्यात आले आहे. हे पेय कॅफिनमुक्त आहे म्हणून जे लोक सकाळी कॉफीचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्यासाठी उत्तम आहे.
यासारखे पेय धावपळीच्या जीवनशैलीसाठी योग्य. तयार करणे सोपे, स्वस्त आणि भरपूर फायद्यांनी भरलेले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुमची आवड आणि आरोग्यदायी फायद्यांनुसार बदल करू शकता. आले, व्हिटॅमिन सीसाठी लिंबू, पचन नीट होण्यासाठी ओवादेखील त्यात मिसळू शकता.
नेहाच्या पोस्टमधून हे लक्षात येते की, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कठोर डाएट्स किंवा अवघड चॅलेंजेस स्वीकारण्याची गरज नाही. अशा प्रकारचे साधे पेयही तुमची दिवसाची सुरुवात शांत आणि सकारात्मक पद्धतीने करण्यास मदत करू शकते. त्यामुळे पचनसंस्था, त्वचा दोन्हीही आनंदी आणि निरोगी राहू शकते.