चिनी मोबाइल कंपनी Vivo ने भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त Vivo ने वीवो फ्रिडम कार्निवल सेल आणला आहे. 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान हा सेल असणार आहे. आज मध्यरात्री 12 वाजेपासून हा सेल सुरू होत आहे. Vivo च्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन सुरू होईल.
या ऑनलाइन सेलमध्ये कंपनीकडून त्यांचा फ्लॅगशिप फोन Vivo Nex वर विशेष ऑफर देण्यात आली आहे. 44 हजार 999 रुपये किंमत असलेला हा फोन अवघ्या 1947 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं म्हणून या फोनची 1947 रुपयांमध्ये विक्री केली जाणार आहे. याशिवाय या सेलमध्ये वीवोच्या इतर अनेक फोनवर आणि प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळणार आहे, तसंच कॅशबॅक आणि कूपन्सही मिळतील.