भारताचे आघाडीचे डिजिटल आर्थिक सेवा प्रदाता व्‍यासपीठ पेटीएमने नुकतीच एलपीजी सिलेंडर बुकिंगवर आकर्षक कॅशबॅक व इतर रिवॉर्डसची घोषणा केली. नवीन युजर्स ‘३ पे २७००’ कॅशबॅक ऑफरचा लाभ घेऊ शकतील. या ऑफरमध्ये  युजर्सला सलग ३ महिन्‍यांच्या पहिल्‍या बुकिंगकरिता जवळपास ९०० रूपयांची खात्रीदायी कॅशबॅक मिळेल. आधीपासूनच्या युजर्सना प्रत्‍येक बुकिंगवर खात्रीदायी रिवॉर्ड व जवळपास ५००० कॅशबॅक पॉइण्‍ट्स मिळतील. हे पॉइण्‍ट्स चांगल्या ब्रॅण्‍ड्सच्या वस्तू विकत करण्यासाठी घेता येईल. ही ‘३ पे २७००’ कॅशबॅक ऑफर इंडेन, एचपी गॅस व भारत गॅस या तिन्‍ही प्रमुख एलपीजी कंपन्‍यांच्‍या सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. ग्राहकांसाठी पेटीएम पोस्‍टपेड म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या पेटीएम नाऊ पे लेटर प्रोग्रॅममध्‍ये नोंदणी करत बुक केलेल्‍या सिलेंडरसाठी रक्‍कम पुढील महिन्‍यामध्‍ये भरण्‍याचा पर्याय देखील असेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैशिष्‍ट्यपूर्ण फिचर

नुकतेच कंपनीने युजर्सना त्‍यांच्‍या गॅस सिलेंडरच्‍या डिलिव्‍हरीवर देखरेख ठेवणा-या, तसेच रिफिल्‍ससाठी ऑटोमेटेड इंटेलिजण्‍ट रिमांइडर्स देणा-या नाविन्‍यपूर्ण फिचरसह सिलिंडर बुकिंगचा अनुभव छान करण्याचा प्रयत्न केला आहे. पेटीएमच्‍या सोप्प्या, सुलभ बुकिंग प्रक्रियेने एलपीजी सिलेंडर बुकिंग अत्‍यंत सहजतेने केले जाऊ शकते. युजरला फक्‍त एवढेच करायचे आहे की, ‘बुक गॅस सिलेंडर ‘ टॅबवर जाऊन गॅस प्रोव्हायडर निवडावे नंतर मोबाइल क्र. / एलपीजी आयडी/ग्राहक क्र. टाकावा पुढे त्‍यानंतर पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्डस् व नेट बँकिंग्‍स अशा कोणत्याही पसंतीच्‍या पेमेंट मोडचा वापर करून पैसे भरावे. जवळच्‍या गॅस एजन्‍सीकडून सिलेंडर नोंदणीकृत पत्त्यावर डिलिव्‍हर केला जाईल.

पेटीएमचे प्रवक्‍ता म्‍हणाले, “भारतीय कुटुंबं एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी सर्वाधिक खर्च करतात. आम्‍ही सर्व युजर्ससाठी या युटिलिटीचे डिजिटल पेमेंटस लाभदायी बनवण्‍याशी कटिबद्ध आहोत. काळासह एलपीजी सिलेंडर रिफिल्‍ससाठी ऑनलाइन बुकिंग व पेमेंटचा वापर करणा-या युजर्सच्‍या संख्‍येमध्‍ये प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. अनेक नवीन ऑफर्स व सुधारित यूआयसह आम्‍ही नवीन युजर्सपर्यंत पोहोचण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत.”

पेटीएमने गेल्‍या वर्षी एचपी गॅससोबत आणि त्‍यानंतर इंडियन ऑईलचे इंडेन आणि भारत गॅससोबत सहयोग करत ‘बुक ए सिलेंडर’ सेवा सुरू केली. या सुलभ बुकिंग प्रक्रियेमुळे व्‍यासपीठावर वारंवार व्‍यवहार करणा-या ग्राहकांच्‍या संख्‍येमध्‍ये वाढ होताना दिसत आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paytm offers cashback up to rs 2700 on lpg cylinder booking users can book now pay next month ttg