भारतामध्ये थ्रीफिंग वाढू लागलं आहे. थ्रीफिंग म्हणजे वापरलेल्या परंतु अजूनही बऱ्याच काळ सहज टिकतील अश्या वस्तूंची विक्री आणि खरेदी. सोप्या भाषेत सेकंड-हँड वस्तूची खरेदी किंवा विक्री करणे. पूर्वी सेकंड-हँड वस्तूंची खरेदी करायला लोकांना आवडायचं नाही. परंतु आता याच पद्धतीच्या खरेदीचा ट्रेण्ड वाढत आहे. या वस्तू तुम्हाला मूळ किंमतीपेक्षा कमी दराने मिळतात. आणि वस्तू शक्यतो चांगल्या स्थितीत असतात. तसेच अशा पद्धतीने केलेली खरेदी- विक्री ही पर्यावरणपूरक, सस्टेनेबल म्हणून प्रसिद्ध होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मिडिया इनफ्लुंसरमुळे ट्रेण्ड

भारतात थ्रीफिंग ट्रेण्डमध्ये येण्यामागे सोशल मीडिया इनफ्लुंंसर आहेत. एम्मा चेंबरलेन ह्या युट्यूबरने तिच्या चॅनेलवर नियमितपणे हा ट्रेण्ड दाखवणारे व्हिडिओ प्रदर्शित केले आहेत. या व्हिडिओमुळे लोकांना या ट्रेण्डविषयी अधिक माहिती मिळत आहे. आणि साहजिक यामुळे त्यांचाही कल सेकंड-हँड वस्तूंची खरेदी करण्याकडे वळत आहे. थ्रीडअपच्या २०२१च्या रीसेल अहवालानुसार, अशा प्रकारे सेकंड-हँड वस्तूची विक्री पुढील पाच वर्षात दुप्पट होण्याचा अंदाज आहे. लॉकडाउनच्या काळात थ्रीफिंग अचानक जास्त प्रमाणात वाढलं आहे. विक्रेते अशा जास्तीत जास्त वस्तू बाजारात आणत आहेत. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अशा पद्धतीचे कपडे विकणारी खूप पेजेस आहेत. थ्रीडअपने थ्रीपिंगला ‘न्यू पँडेमिक हॅबीट’ असंही म्हटलं आहे.

लॉकडाऊनमध्ये तरुणांचे थ्रिफ्ट स्टोअर्स

भारतात आणि इतर देशातही  इन्स्टाग्रामवर वस्तू विकण्याचं प्रमाण वाढलं आहे. यात अनेक तरुण आपलं पेज सुरु करून थ्रीफिंग पद्धतीने वस्तू विकत आहे. अनेकजण थ्रिफ्ट स्टोअर्सने आपल्या करिअरची सुरवात देखील करत आहेत. झू, इम आणि अरेन या बहिणींनी लॉकडाउनच्या काळात zuwsiime.circle हे इन्स्टाग्राम थ्रिफ्ट स्टोअर सुरु केलं. त्या विकण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी लोकल मार्केटमधून करतात. लॉकडाउनच्या काळात ग्राहकांनी थ्रीफिंग पद्धतीने जास्त खरेदी केल्याचंही त्या सांगतात. अशा सेकंड-हँड वस्तूंची खरेदी करणारी अमृता इंडियन एक्प्रेसशी बोलताना सांगते, “कपडे खरेदी करताना आपण नेहमीच सामान्य कपड्यांची खरेदी करत नाही. आपण काही वेळा वेगळ्या जुन्या स्टाईलच्या कपड्यांच्या शोधातही असतो. असे कपडे मला थ्रिफ्ट स्टोअर्समध्ये सहज मिळतात जे बाकीच्या दुकानात मिळत नाहीत.”

 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Platforms like instagram paving a new way to sell and shop ttg