टू-व्हीलर सेगमेंटच्या बाइक सेगमेंटमध्ये मायलेज बाइक्सशिवाय स्पोर्ट्स, क्रूझर आणि अॅडव्हेंचर बाइक्सची विस्तृत श्रेणी आहे. ज्यामध्ये आज आम्ही १६० सीसी इंजिन असलेल्या टॉप ३ बाईक्सबद्दल बोलत आहोत, त्या कमी बजेटमध्ये येतात आणि मजबूत स्पोर्टी स्टाईलसह लांब मायलेज देतात.जर तुम्हालाही १६० सीसी सेगमेंट स्पोर्ट्स बाईक खरेदी करायची असेल तर आम्ही येथे तुम्हाला तिन्ही बाइक्सच्या किंमतीपासून ते स्पेसिफिकेशन पर्यंत संपूर्ण तपशील सांगू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

TVS Apache RTR 160

ही त्यांच्या कंपनीची लोकप्रिय बाईक आहे, जी कंपनीने दोन प्रकारात लॉंच केली आहे. या बाईकमध्ये TVS ने १५९.७ सीसी चे सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर-कूल्ड फ्यूल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १५.५३ पीएस पॉवर आणि १३.९ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

( हे ही वाचा: Gold: सर्वात स्वस्त सोनं ‘इथे’ उपलब्ध; १० ग्रॅमवर बंपर सवलत!)

समोरच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये डिस्क ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे ज्यामध्ये ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत.मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की ही बाईक ४५ ते ५० किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत १.०७ लाख रुपये आहे, जी टॉप मॉडेलमध्ये १.१० लाख रुपयांपर्यंत जाते.

(हे ही वाचा: लोखंडी खिडकी, ग्रील्सवरील गंज काढण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स! )

Honda X Blade

होंडा एक्स ब्लेड ही एक आक्रमकपणे डिझाइन केलेली स्पोर्ट्स बाईक आहे जी कंपनीने दोन प्रकारात बाजारात आणली आहे.होंडा ने या बाईक मध्ये १६२.७१ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे जे एअर कूल्ड इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानावर आधारित इंजिन आहे. हे इंजिन १३.८ पी येस पॉवर आणि १४.७ एनएम पीक टॉर्क जनरेट करते, जे ५-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

कंपनीने बाईकच्या पुढच्या आणि मागच्या चाकांमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत, ज्यामध्ये सिंगल चॅनल एबीएस सिस्टीम देण्यात आली आहे. दुचाकीचे टायर ट्यूबलेस लावण्यात आले आहेत.होंडा एक्स ब्लेडच्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक प्रति लीटर ५० किलोमीटरपर्यंत मायलेज देते. या बाईकची सुरुवातीची किंमत १.११ लाख रुपये आहे जी टॉप मॉडेलमध्ये १.१६ लाख रुपयांपर्यंत जाते.

( हे ही वाचा: Tata Punch पासून Mahindra Thar पर्यंत…’या’ आहेत भारतातील टॉप १० सुरक्षित कार )

Bajaj Pulsar NS 160

बजाज पल्सर एनएस १६० ही एक वेगवान स्पोर्ट्स बाईक आहे जी तिच्या वेग आणि डिझाइनसाठी पसंत केली जाते. कंपनीने या बाईकचे फक्त एक वेरिएंट बाजारात आणले आहे.बजाजने या बाईकमध्ये सिंगल सिलेंडर १६०.३ सीसी इंजिन दिले आहे जे एअर आणि ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे. हे इंजिन १७.२ पीएस पॉवर आणि १४.६ एनएम पीक टॉर्क जनरेट करते आणि या इंजिनसह ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

( हे ही वाचा: Photo: Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार रेटिंगसह टाटा पंच बनली भारतातील सर्वात सुरक्षित कार! )

बाईकच्या मायलेजबाबत बजाजचा दावा आहे की ही बाईक ४८.६ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मायलेज देते. त्याची सुरुवातीची किंमत १.१६ लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Powerful style and speed this the top three sports bikes come in a budget of one lakh know more details ttg