उंदीर हा गणेशाचा वाहक मानला जातो. म्हणून मंदिरात गणपती बाप्पासोबत उंदराची श्रद्धेने पूजा केली जाते. मात्र गणपतीचा वाहक जेव्हा घरात प्रवेश करतो तेव्हा तो घरातील सर्व वस्तूंचा नायनाट करून टाकतो. अगदी खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून ते डब्ब्यांपर्यंत आणि विजेच्या तारांपर्यंत सर्व काही कुरडून खराब करतो. यामुळे उंदरांना घराबाहेर काढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. अनेकजण घराच पिंजऱ्यात विष टाकलेली भाकरी लटकवून ठेवतात. पण आता उंदरही हुशार झाले आहेत, पिंजऱ्यात न अडकता ते भाकरी सहज खाऊन जातात. अशापरिस्थितीत आज आम्ही तुम्हाला घरातील उंदरांपासून सुटका करुन घेण्यासाठी काही रामबाण उपाय सांगणार आहोत. ज्या मदतीने तुम्ही घरातील उंदीर न मरताच बाहेर जातील, जाणून घ्या उंदरांपासून सुटका करुन घेण्याचे ५ घरगुती उपाय

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पेपरमिंट स्प्रे

उंदरांना पुदिन्याचा वास अजिबात आवडत नाही. यामुळे उंदीर ज्या जागी जातात, त्या जागी पेपरमिंट स्प्रे शिंपडा, उंदीर घाबरून ती जागा सोडून लगेच पळून जातील, या

तंबाखू

आरोग्यासाठी तंबाखू हानिकारक असली तरी उंदरांना पळवून लावण्यासाठी उत्तम मानली जाते. यामुळे घरातील उंदरांच्या दहशतीमुळे हैराण असाल तर तंबाखूचा वापर करु शकता. बेसनात थोडा तंबाखू मिसळून तो उंदरांच्या जागेवर ठेवा, यामुळे सर्व उंदीर एकाचवेळी नाहीसे होतील.

तुरटी

उंदरांना पळवून लावण्यासाठी तुरटी पावडरची पातळ पोस्ट तयार करा. मग तुम्ही ही पेस्ट उंदरांच्या बिलांजवळ शिंपडा. यामुळे सर्व उंदीर जागा सोडून स्वतःहून पळून जातील.

लाल मिरची

जर तुमच्या घरात उंदीर येत-जात असतील तर ते ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी लाल तिखट टाका. यामुळे उंदीर पुन्हा त्या ठिकाणी येण्याचे धाडस करणार नाही.

कपूर

कापूरचा वास आल्यावर श्वास फुगायला लागतो. अशा परिस्थितीत कापूरचे तुकडे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवा. त्यामुळे उंदीर अस्वस्थ होऊन घरातून पळून जातात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Proven tips and tricks on how to get rid of rats at home permanently sjr