आपल्यापैकी अनेकांची ही तक्रार असते कि WhatsApp वर पाठवलेल्या फोटोज आणि व्हिडीओजची क्वालिटी चांगली नसते. पण तुमची ही नाराजी आता दूर होणार आहे. कारण, व्हॉट्सअ‍ॅप एका नवीन फिचरची चाचणी करत आहे. या फिचरसह व्हॉट्सअ‍ॅपद्वारे फोटोज आणि व्हिडिओ पाठवण्यापूर्वी त्यांची गुणवत्ता निवडण्याचा पर्याय असेल. याद्वारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एचडी फोटो देखील पाठवू शकाल. पण तुम्हाला माहिती आहे का? कि खरंतर हा पर्याय व्हॉट्सअ‍ॅप युझर्सकडे आजही उपलब्ध आहे. तो कसा? तेच आज आपण पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही आताही व्हॉट्सअ‍ॅपवर हाय रिझोल्यूशन किंवा एचडी फोटो पाठवू शकता. तर १०० एमबीपर्यंतचे व्हिडिओ त्याच्या पूर्ण रिझोल्यूशनमध्ये पाठवू शकता. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. यासह, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपद्वारे हाय-रिझोल्यूशनचे फोटोज-व्हिडीओज सहज पाठवू शकाल. पण एक लक्षात घ्या कि, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो हाय-रिझोल्यूशनमध्ये पाठवताना तुमच्या डेटाचाही जास्त प्रमाणात वापर होईल. या पद्धतीने तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ देखील पाठवू शकता (आकार १०० एमबी पेक्षा कमी).

WhatsApp वर हाय-रिझोल्यूशनमध्ये फोटो किंवा व्हिडिओ पाठविण्यासाठी ही प्रक्रिया फॉलो करा :

सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा. तुम्हाला ज्यांना हाय रिझोल्यूशनचे फोटो किंवा व्हिडिओ पाठवायचे आहेत ती चॅट ओपन करा. त्यानंतर तुमच्या चॅट बॉक्सच्या उजव्या बाजूला असलेल्या क्लिपच्या आयकॉनवर क्लिक करा. क्लिपच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध पर्याय दिसतील. यामध्ये तुम्हाला इमेज किंवा व्हिडिओचा पर्याय न निवडता डॉक्युमेंटचा पर्याय निवडावा लागेल.

तुम्हाला व्हिडिओ किंवा फोटो हाय-रिझोल्यूशनमध्ये पाठवायचा आहे तो सिलेक्ट करावा लागेल. यासाठी तुम्ही फाईल मॅनेजरमध्येही जाऊ शकता. येथे फोटो किंवा व्हिडिओ निवडल्यानंतर सेंड या चिन्हावर क्लिक करा. आपला फोटो पूर्ण आकारात युझरकडे जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ पाठवायचा असेल तर तुम्ही त्याच प्रकारे १०० एमबीपेक्षा कमी व्हिडिओ पाठवू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Send high resolution photos and videos on whatsapp learn process gst